Saturday, March 14, 2026
HomeChandrapurमाध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरचा उपक्रम, पेन्शन केस साठी एकाच्या जागी...
spot_img

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरचा उपक्रम, पेन्शन केस साठी एकाच्या जागी दुसऱ्याचे कागदपत्र अपलोड

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरचा उपक्रम, पेन्शन केस साठी एकाच्या जागी दुसऱ्याचे कागदपत्र अपलोड

संबंधित लिपिकाला चिरीमिरी न दिल्याचा परिणाम 

ज्योत्स्ना वानखेडे:

श्री. राजू किसनराव वानखेडे सहाय्यक शिक्षक जनता हायस्कूल (डेपो शाखा) या शाळेतून दिनांक: 31/12/ 2025 रोजी सेवानिवृत्त झाले.

त्यांचे ऑनलाइन फार्म ए, फॉर्म बी, फार्म सी व नमुना ४२ अ शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी त्यांच्या जागी श्रीमती दूधपचारे यांचे दिनांक: 29/12/2025 रोजी अपलोड केले.

जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर यांनी दिनांक:05/01/2026 रोजी सेवानिवृत्ती प्रकरण कोषागार कार्यालय चंद्रपूर येथे सादर केले.

कोषागार कार्यालय चंद्रपूर यांनी कागदपत्रे तपासली असता ऑफलाइन प्रस्तावामध्ये श्री. राजू किसनराव वानखेडे यांचे कागदपत्र दिसत होते व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरच्या उपक्रमामध्ये श्रीमती दूधपचारे यांचे कागदपत्र दिसत होते.

करिता त्यांनी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना श्रीमती दूधपचारे यांचे ऑनलाइन केलेले कागदपत्र डिलीट करून त्यांच्या जागी श्री. राजू किसनराव वानखेडे यांचे कागदपत्र अपलोड करण्याच्या सूचना दिल्या.

शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये चिरीमिरी घेतल्याशिवाय बरोबर काम केल्या जात नसून अशा प्रकारचे धंदे त्यांना बरोबर सुचत आहे.

श्री. राजू किसनराव वानखेडे यांनी कोषागार अधिकारी चंद्रपूर यांच्याशी संपर्क केल्यामुळे ही सर्व भानगड त्यांच्या लक्षात आली व त्यांनी शिक्षण विभाग माध्यमिक, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना विचारपूस केली असता हे सर्व प्रकरण चिरीमिरी न दिल्यामुळे घडल्याचे चर्चिले जात आहे.

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या लक्षात जेव्हा ही भानगड आली तेव्हा त्यांनी श्री.  राजू किसनराव वानखेडे यांचे कागदपत्र दिनांक:05/02/ 2026 ला अपलोड केले.

कार्यालयाच्या मूर्खपणामुळे दिनांक:06/02/2026 रोजी त्रुटीची पूर्तता करून केस पुनश्च कोषागार कार्यालय चंद्रपूर यांना देण्यात आली. याचा अर्थ असा निघतो की जे पेन्शनचे क्लेम मार्चच्या एक तारखेला भेटायला पाहिजे ते एप्रिल महिन्यात गेले.

कोषागार कार्यालय चंद्रपूर व माध्यमिक शिक्षण विभाग चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या साठगाठीमुळे सन 2024 मध्ये बोगस शालार्थ आयडी वाल्यांचा मार्च महिन्याचा पगार काढण्यात आला होता. त्याच्यावर आतापर्यंत वसुलीची काहीच कारवाई झाली नाही.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या बोगस शालार्थ आयडी धारकाचे नियमितपणे पगार या दोन्ही कार्यालयाच्या साठगाठीने  सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने यांचा सल्ला घेऊन नागपूर येथील 632 बोगस शालार्थ आयडी धारकांचे पगार चालू करण्याची मागणी जोर धरत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page