Saturday, April 18, 2026
HomeGadchiroliआ. सुधीर मुनगंटीवार यांचे मार्कंडा देवस्थानाची विकासकामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे निर्देश
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मार्कंडा देवस्थानाची विकासकामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे निर्देश

आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मार्कंडा देवस्थानाची विकासकामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे निर्देश

१४.८५ कोटींच्या कामांसाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याच्या सूचना

राज्यमंत्री श्री. आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन

आ. मुनगंटीवार यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना


Jyotsna Wankhede: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा (मार्कंडेश्वर) शिवमंदिराच्या संवर्धन व परिसर विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. ही विकासकामे मिशन मोडवर राबवून २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. या संदर्भात मंत्रालयात वित्त राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाचा विकास मिशन मोडवर करण्याची गरज अधोरेखित केली.

राज्य पुरातत्व विभाग व जिल्हा नियोजन समितीमार्फत विदर्भातील संरक्षित स्मारके, ऐतिहासिक स्थळे, स्मृतिचिन्हे, मंदिरे तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मंजूर १४ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या कामांची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी विदर्भातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या संदर्भात मंत्रालयात मा. वित्त राज्यमंत्री श्री. आशिषजी जयस्वाल यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाचा विकास मिशन मोडवर करण्याची गरज अधोरेखित केली.

कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ही समिती दर आठवड्याला प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा आढावा घेणार आहे. तसेच केंद्रीय पर्यटन मंत्री मा. ना. श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांना गडचिरोलीतील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी निमंत्रित करण्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

देवस्थान परिसरातील १०० मीटर व ३० मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम अथवा अतिक्रमण होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली यांनी स्थानिक ग्रामसेवकांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय, विकासकामे दोन टप्प्यांत होणार असताना दुसऱ्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यता व निधी मागणीसाठी झालेल्या तीन वर्षांच्या विलंबाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला या बैठकीत देण्यात आले.

बैठकीत मंदिराच्या जतनासाठी शास्त्रशुद्ध पुनर्निर्माण, प्राचीन वास्तूशैलीचे संवर्धन, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. श्री मार्कंडा शिव मंदिराचा विकास हा केवळ धार्मिक स्थळापुरता मर्यादित नसून गडचिरोलीच्या सांस्कृतिक ओळखीला बळकटी देणारा आणि पर्यटनवृद्धीस चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page