Friday, April 17, 2026
Homeबल्लारपूरपोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात बल्लारपुर तालुकाचे पाच गावांचा समावेश
spot_img

पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात बल्लारपुर तालुकाचे पाच गावांचा समावेश

पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात बल्लारपुर तालुकाचे पाच गावांचा समावेश

ज्योत्स्ना वानखेडे: राज्यातील जमीनीचे नकाशे आणि सातबारा यामधील तफावत दुर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय योजना २०२४-२५ अंतर्गत महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आलेले आहे. जमिनीची पोटहिस्सा मोजणी आणि नकाशा अदयावत करण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर या तालुक्याची पहिल्या टप्यात निवड करण्यात आली आहे.
राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून तीन तालुक्यांची या प्रकल्पासाठी निवड झाली असून एकूण १८ तालुक्यामध्ये हा अदयावतीकरणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. जमीनीच्या सध्याच्या धारकाप्रमाणे पोटहिसा मोजणी करून शासकीय अभिलेख अदयावत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
बल्लारपूर तालुक्यातील ५ गावांची या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये  १) आष्टी २) कळमना ३) जोगापूर ४) कोर्टीमक्ता ५) कोर्टीतुकुम या गावाची निवड करण्यात आलेली आहे.
प्रकल्पाचे फायदे ७/१२ आणि नकाशा यातील विसंगती संपल्यामुळे जमीनीचे व्यवहार पारदर्शक होतील, पोटहिस्सा मोजणीमुळे जमिनीच्या सिमावरून होणारे वाद कमी होतील आणि शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा अचुक डिजीटल नकाशा उपलब्ध होईल.
 प्रदिप जगताप जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख चंद्रपूर यांनी दिलेल्या माहितीनूसार निवडलेल्या ५ हि गावातील सव्र्व्हे नंबराचे नकाशे, गटनकाशे, टिपण, आणि पोटहिसा नकाशे यांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या डिजीटल डेटाची पडताळणी देखील पुर्ण झाली असून पूढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्जू झाले आहे.तसेच सर्व खातेदारानी पोटहिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन  अनिल द. देशमुख उपअधीक्षक भूमि अभिलेख बल्लारपूर यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page