Thursday, April 16, 2026
HomeMaharashtraमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा : धानाला बोनस देण्याबाबत राज्य शासन...
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा : धानाला बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा : धानाला बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Jyotsna Wankhede: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. धान पिकाला बोनस (प्रोत्साहनपर राशी ) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित करून धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा विधानसभेच्या पटलावर पोट तिडकीने मांडली होती. धान उत्पादनासाठी वाढलेला खर्च, नैसर्गिक आपत्तींचे संकट आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
आज अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत राज्य शासन धान पिकासाठी बोनस देण्याच्या निर्णयाबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या धान उत्पादक जिल्ह्यांतील धान  उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सातत्याने विधानसभेत मांडल्या.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर करत शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती वेळोवेळी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने आणि आक्रमकपणे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाला या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. परिणामी धानाला बोनस देण्याबाबत सकारात्मक भूमिका जाहीर होणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या संघर्षाला न्याय मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page