Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeNagpurअनुकंपा प्रकरणात शिक्षणाधिकारी,योजना, फक्त शिफारस करणार ! - कृष्णकुमार पाटील,शिक्षण संचालक (योजना)...

अनुकंपा प्रकरणात शिक्षणाधिकारी,योजना, फक्त शिफारस करणार ! – कृष्णकुमार पाटील,शिक्षण संचालक (योजना) पुणे

अनुकंपा प्रकरणात शिक्षणाधिकारी,योजना, फक्त शिफारस करणार ! – कृष्णकुमार पाटील,शिक्षण संचालक (योजना) पुणे

ज्योत्स्ना वानखेडे:
          शिक्षण विभागाने, दिनांक २७ जानेवारी २०२६ ला खासगी शाळेत अनुकंपा नियुक्तीस मान्यतेसाठी शासन निर्णय निर्गमित केला, एक नवीन उपद्व्याप सुरू केला आहे,  कृष्णकुमार पाटील,शिक्षण संचालक,योजना, यांच्या मते शिक्षणाधिकारी योजना, फक्त शिफारस करणार व मान्यता शि‌क्षणाधिकारी माध्यमिक मान्यता प्रदान करणार असे स्पष्ट केले
         श्रीमती कल्पना पत्नी मयत शिक्षक दुर्वास ईखारकर, महात्मा गांधी  विद्यालय वानाडोंगरी नागपूर मुलगा धिरज दुर्वास ईखारकर, बी ई सिव्हिल, अनुकंपा लिपिक पदावर मान्यतेसाठी दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रस्ताव  शिक्षणाधिकारी,माध्यमिक नागपूर यांचेकडे सादर करण्यात आला आहे.अद्यापही अनुकंपा नियुक्तीस मान्यता मिळाली नाही.त्यामुळे दिनांक १ मे २०२६,महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बेमुदत उपोषणाबाबत निर्णय घेतला आहे.
      खाजगी शाळा शिक्षक संघटने शिक्षण संचालक योजना यांना अनुकंपा नियुक्तीबाबत नागपूर विभागातील वस्तुस्थिती स्पष्ट करतांना, शिक्षणाधिकारी, योजना,नागपूर यांनी प्रतिक्षा यादीसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक  यांना अनुकंपा प्रकरणे परत पाठविली आहे,त्यांचेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, तो उपलब्ध  व्हावा असेही  मत व्यक्त केले आहे.
   शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा चंद्रपूर यांनी अनुकंपा प्रकरणे शिक्षणाधिकारी, योजना यांचेकडे कार्यभार सोपविण्यात आलेला आहे, योजना कार्यालयातील लिपिक यांनी अद्याप अनुकंपा ग्रस्तांना आणि संस्थेला आदेश अदा केलेले नाही,ही शोकांतिका असुन शिक्षणाधिकारी योजना जिल्हा वर्धा, व भंडारा जिल्हा यांचेकडे प्रकरणे प्रलंबित आहेत कार्यवाही करण्यात आलेली नाही  असे खाजगी शाळा शिक्षक संघाने कृष्णकुमार पाटील,शिक्षण संचालक,योजना, पुणे यांचे निदर्शनास आणून दिले आहे, तक्रारींची प्रत आयुक्त शिक्षण , मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर व चंद्रपूर तसेच शिक्षण संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांना पाठविण्यात आली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page