Saturday, May 30, 2026
HomePolice*अवैध रेती तस्करीवर LCB ची मोठी कारवाई* *9 ब्रास रेतीसह...
spot_img

*अवैध रेती तस्करीवर LCB ची मोठी कारवाई* *9 ब्रास रेतीसह चालक अटक; वाहन मालक फरार*

*अवैध रेती तस्करीवर LCB ची मोठी कारवाई*   *9 ब्रास रेतीसह चालक अटक; वाहन मालक फरार*

*ज्योत्स्ना वानखेडे* 
बल्लारपूर क्षेत्रातील अवैध रेती तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत सुमारे 45 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बामणी टी-पॉईंट परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की पोंभूर्णा परिसरातून अवैधरीत्या रेती भरून एक हायवा ट्रक बल्लारपूर मार्गाने जाणार आहे. या माहितीच्या आधारे LCB पथकाने सकाळी सुमारे 5 वाजता बामणी टी-पॉईंटवर नाकाबंदी करून संशयित वाहन थांबवले.
तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 9 ब्रास रेतीचे अवैध वाहतूक केली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून TATA Signa कंपनीचा हायवा ट्रक (MH 34 CQ 1190) जप्त केला. जप्त केलेल्या वाहनाची किंमत सुमारे 45 लाख रुपये सांगण्यात आली आहे, तर ट्रकमध्ये भरलेल्या रेतीची अंदाजे किंमत 90 हजार रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 45 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
कारवाई दरम्यान चालक गणेश शिवाजी कोरपल्लेवार (25), राहणार नारपटार, तहसील जिवती याला अटक करण्यात आली. तर वाहन मालक गोपीनाथ राठोड, राहणार सारंगापूर, तहसील जिवती हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 49, भूमी महसूल अधिनियम आणि मोटर वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार संतोष येलपुलवार आणि गणेश भोयर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page