Saturday, May 30, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपुरात कांग्रेसचा पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढी विरोधात आक्रोश नगरपालिका चौकात...
spot_img

बल्लारपुरात कांग्रेसचा पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढी विरोधात आक्रोश नगरपालिका चौकात धरणे आंदोलन : तहसीलदारांना दिले मागण्याचे निवेदन

बल्लारपुरात कांग्रेसचा पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढी विरोधात आक्रोश

नगरपालिका चौकात धरणे आंदोलन : तहसीलदारांना दिले मागण्याचे निवेदन

ज्योत्स्ना वानखेडे: केंद्र सरकार ने नियोजन शून्य कारभाराचा परिचय पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर ची दरवाढ केली.यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेला महागाईच्या खाईत ढकलत असून इंधन दर वाढ मागे घ्या, म्हणून कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका चौकात धरणे आंदोलन करून आक्रोश व्यक्त केला. यासंदर्भात बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
ज्यावेळी देशात डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी देशाची अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने हाताळली होती. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर चे दर आटोक्यात होते.आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाच्या कार्यकाळात इंधन दरवाढीचा दर दुप्पट झाला आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचा चटका सोसावा लागत आहे. त्यांच्या नियोजन शून्य कारभाराचा हा परिणाम आहे, असा आरोप कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
बल्लारपूर येथील पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढीचे आंदोलन शहर कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. अलका अनिल वाढई, ॲड.मेघा भाले,अफसाना सय्यद, गोविंदा उपरे, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे,मेहमुद पठाण,रवि मांतगी,नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगरसेवक नासिर खान, अनिल खरतड,हेमंत मानकर यांच्या सह कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांना निवेदन सादर करून इंधन दरवाढीचा प्रश्न निकालात काढण्याची मागणी केली.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page