Saturday, June 13, 2026
HomeSawali*पोलीस स्टेशन सावली हद्दीत प्रतिबंधीत तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा* *एकूण...
spot_img

*पोलीस स्टेशन सावली हद्दीत प्रतिबंधीत तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा* *एकूण ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त,* *स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कामगिरी*

*पोलीस स्टेशन सावली हद्दीत प्रतिबंधीत तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा*

*एकूण ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त,*

*स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कामगिरी*

*ज्योत्स्ना वानखेडे*

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून, मशीनच्या सहाय्याने बनावट (डुप्लिकेट) तंबाखूची निर्मिती व विक्री करणाऱ्या एका केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त छापा टाकला. सावली तालुक्यातील मौजा रयतवारी येथे दिनांक ११ जून २०२६ रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मौजा रयतवारी (ता. सावली) येथे विजय भिमाजी भांडेकर (वय ३३ वर्षे, रा. सामदा बु. ता. सावली) हा बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा बाळगून आहे. तसेच तो मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करून त्याची बाजारात विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने रयतवारी येथील संशयास्पद ठिकाणावर छापा टाकला.

*जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:* कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून खालील साहित्य जप्त केले:

– HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू

– खुला सुगंधित तंबाखू

– तंबाखू पॅकिंगसाठी लागणारे साहित्य

– उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री (मशीन)

– वाहन क्रमांक (MH-34-CJ-9625)

*एकूण जप्त माल अं.किंमत: ₹११,३१,४००/-*

पोलिसांनी पकडलेल्या आरोपी विजय भांडेकर याची कसून चौकशी केली असता, त्याने हा सर्व कच्चा माल आणि साहित्य विनय गुप्ता (रा. गोकुळ नगर, गडचिरोली) यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. जप्त साहित्यावरून आरोपी हा मोठ्या प्रमाणावर बनावट तंबाखूचे पॅकिंग आणि बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांन्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावली पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल श्री सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस निरीक्षक श्री प्रदीप पुल्लरवार पो.स्टे सावली तसेच अन्न व अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वात सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री दीपक कॉन्क्रेटवार, सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, स.फौ. धनराज करकडे, पोहवा. गणेश भोयर, पोहवा. चेतन गज्जलवार, पोहवा. संतोष येलपुलवार, पोहवा. जयसिंग, चापोहवा. दिनेश आराडे, पो.अं. सुमित बर्डे, पो.अं. प्रफुल गारघाटे, चापोअं. मिलिंद टेकाम, ऋषभ बारसिंगे तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page