Monday, July 6, 2026
HomeChandrapurचंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संमेलन; विशेष सघन पुनरिक्षण (SIR)...
spot_img

चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संमेलन; विशेष सघन पुनरिक्षण (SIR) बाबत मार्गदर्शन

चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संमेलन; विशेष सघन पुनरिक्षण (SIR) बाबत मार्गदर्शन

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनीचे आयोजन

*Jyotsna Wankhede*:

चंद्रपूर येथील सभागृहात रविवारी भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर महानगरच्या वतीने कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात संघटनात्मक बांधणी, विशेष सघन पुनरिक्षण (SIR) अभियान, मतदार यादी पुनर्तपासणी तसेच बीएलओ-२ पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, महानगर प्रभारी अर्चना देहनकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. अशोक जीवतोडे, माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनोज पाल, सविता दंढारे, श्याम कनकम, नामदेव डाहुले, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, मनपा गटनेते शेखर शेट्टी, विनोद शेरखी, नगरसेविका सविता कांबळे, अजय बावणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

विशेष सघन पुनरिक्षण (SIR) अभियान, मतदार यादी पुनर्तपासणी तसेच बीएलओ-२ पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. श्यामा प्रसाद मुर्खजी यांची 125 जयंती वर्ष स्मरण पंधरवाडा निमित्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले की, विशेष सघन पुनरिक्षण अभियान हे लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आणि बीएलओ-२ प्रतिनिधींनी सक्रिय राहून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरणे आणि पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करावे. नवमतदारांची वेळेत नोंदणी व्हावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहावे, यासाठी घराघरांत जाऊन जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना आणि पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत बूथ व्यवस्थापन, संघटन विस्तार आणि जनसंपर्क यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. महानगर प्रभारी अर्चना देहनकर यांनी संघटनात्मक शिस्त, समन्वय आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तर माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने जनसंपर्क ठेवण्याचे आवाहन केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page