Thursday, July 9, 2026
HomePolice*महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू अवैधरित्या कब्जात बाळगणारा रामनगर पोलिसांच्या जाळ्यात. किंमत...
spot_img

*महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू अवैधरित्या कब्जात बाळगणारा रामनगर पोलिसांच्या जाळ्यात. किंमत रु. 67,750/- चा माल जप्त.*

*महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू अवैधरित्या कब्जात बाळगणारा रामनगर पोलिसांच्या जाळ्यात. किंमत रु. 67,750/- चा माल जप्त.*

*ज्योत्स्ना वानखेडे*

रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ व प्रतिबंधित माल कब्जात बाळगणारे व विक्री करणारे लोकांबाबत माहिती घेऊन त्यांच्यावर छापा घालण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके मॅडम यांना देऊन सूचना व मार्गदर्शन केले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अशा प्रकारचे लोकांबाबत माहिती घेऊन प्रभावी कारवाई करण्याबत आदेशीत केले होते.

त्याचप्रमाणे रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू बाळगणारे लोकांबाबत माहिती गोपनीय रित्या घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, *तोफीक करीम भिमानी, वय- 36 वर्षे, रा. नुरी मस्जिद जवळ, रहेमतनगर, चंद्रपूर* हा त्याच्या राहते घरात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला, ईगल, क्रेझ इत्यादी सुगंधीत तंबाखू कब्जात बाळगून असून तिची विक्री करत आहे.

त्यानुसार पोलीस पथकाने पंचासह ईसमाच्या घरावर दि. 08/07/2026 रोजी 21:25 वा. छापा घातला असता त्याच्या कब्जात *67,750/- रु. किं.* महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला, ईगल, क्रेझ तंबाखू मिळून आल्याने पथकाने तो पंचासमक्ष जागीच जप्त करून त्याच्यावर पोलीस स्टेशन रामनगर येथे *अपराध क्र. 905/2026* कलम 123, 223, 275 भारतीय न्याय संहिता सह कलम 30(2) (a), 26 (2) (i), iv, 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि सचिन राखुंडे करीत आहेत.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page