महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका
सुधारित आकृतीबंधाला मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नाला महिला व बालविकास मंत्र्यांचे उत्तर

*Jyotsna Wankhede*:
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजासंदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला आयोगाच्या बळकटीकरणाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
महिला आयोगाला सक्षम मनुष्यबळ, आवश्यक निधी आणि प्रभावी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध व्हावी, महिला तक्रार निवारण प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी तसेच महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात, या उद्देशाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. शासनाने दिलेल्या उत्तरामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागभीड पंचायत समितीतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपदान व अंशराशीकरणाच्या रकमेबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा प्रश्न
सुधीर मुनगंटीवार यांनी नागभीड पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या उपदान व अंशराशीकरणाच्या प्रलंबित रकमेबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
इतर पंचायत समित्यांमध्ये अशा प्रकारची समस्या असल्याचे शासनाने नाकारले असून, या प्रकरणात पुढील चौकशी अथवा शिस्तभंग कारवाईचा प्रश्न उद्भवत नसल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.









