Sunday, July 12, 2026
HomeChandrapurवारकरी कुटुंबाच्या अश्रूंना आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आधार; चार लाखांची आर्थिक मदत...
spot_img

वारकरी कुटुंबाच्या अश्रूंना आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आधार; चार लाखांची आर्थिक मदत मंजूर

वारकरी कुटुंबाच्या अश्रूंना आ. सुधीर मुनगंटीवार यांचा आधार; चार लाखांची आर्थिक मदत मंजूर

आ. मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या वारसांना ४ लक्ष सानुग्रह अनुदान; आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री मकरंदजी जाधव-पाटील यांचे मानले आभार


10 जुलै 2026 शासन निर्णय
*Jyotsna Wankhede*: आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव-पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत शासनाने स्व. पिंपळकर यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. या निर्णयामुळे पिंपळकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, शासनाने दाखविलेल्या या संवेदनशीलतेबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव-पाटील यांचे आभार मानले आहेत.

आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी स्व. प्रफुल पिंपळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शासनाच्या विठ्ठल रखुमाई योजनेअंतर्गत त्यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शासनाने अखेर स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले. या मदतीमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असून, संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव-पाटील यांचे आभार मानले आहे.

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि संतपरंपरेचा जिवंत वारसा असून, वारकरी कुटुंबावर संकट कोसळल्यास त्यांच्या मदतीसाठी आपण तितक्याच संवेदनशीलतेने आणि सातत्याने पाठपुरावा करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पिंपळकर कुटुंबीयांपर्यंत वेळेत व प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आपण यापुढेही कायम कटिबद्ध राहू, अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page