*जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी एस. एम. बोबडे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे सेवानिवृत्त शिक्षक, सुनील माऊलीकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, तसेच प्रमुख उपस्थिती आर. बी. अलाम यांची होती. प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
झेंडावंदन एस. एम. बोबडे मुख्याध्यापक यांच्या हस्ते पार पडले. त्यांची आगुवाई स्काऊट गाईड शिक्षक एस. एम. चव्हाण यांनी केली. शाळेचा विद्यार्थी अथर्व नितेश हिकरे याने देशभक्ती गीत गायन केले. विद्यार्थिनींनी समूह पर देशभक्ती गीत सादर केले.
प्रमुख पाहुणे सुनील माऊलीकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा पीरमिली यांनी सांगितले की,
देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपले बलिदान देऊन महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी, आताच्या काळात शिक्षणात आपले योगदान महत्त्वाचे आहे. प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
यु. के. रांगणकर यांनी सांगितले की देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एस. एम. लोधे मॅडम त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून काहीतरी बनवून दाखवावे. हे त्यांच्या हातात आहे. शिक्षक फक्त आकार देण्याचे काम करतो.
आपले अध्यक्षीय भाषण करताना एस. एम. बोबडे मुख्याध्यापक यांनी सांगितले की, आपला देश हा 150 वर्ष गुलामगिरीत होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या माध्यमातून चळवळ उभी करून स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतरही स्वतंत्र भारताने दुष्काळ, महामारी, 1962 व 1971 चे युद्ध चा सामना केला आहे. आज आपला देश विकसनशील म्हणून मानला जातो. विद्यार्थ्याने आपले योगदान देणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एम. चव्हाण व आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात यू. के. रांगणकर सर, गणेश चंदावार( बाबू) इंद्रभान अडबाले, रजिता वदनलवार, वाल्मीक खोंडे(सेवानिवृत्त), सुभाष पेटकर, सुरेश चापले, शालिक टिपले आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक सहित विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.