Tuesday, August 25, 2026
spot_img
HomeMul*ज्येष्ठ महिलेच्या घरातील १२ ग्रॅम सोन्याची चैन चोरीचा गुन्हा उघडकीस* *चोरीचा मुद्देमाल...

*ज्येष्ठ महिलेच्या घरातील १२ ग्रॅम सोन्याची चैन चोरीचा गुन्हा उघडकीस* *चोरीचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत तर मुख्य आरोपी फरार*

*ज्येष्ठ महिलेच्या घरातील १२ ग्रॅम सोन्याची चैन चोरीचा गुन्हा उघडकीस*

*चोरीचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत तर मुख्य आरोपी फरार*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

पोलीस स्टेशन मुल, जिल्हा चंद्रपूर अप क्रमांक व कलम ५१४/२६ कलम ३०३(३), ३१७(२) BNS

फिर्यादीचे नाव श्रीमती वंदना प्रेमानंद सोरते वय ६७ वर्ष, व्यवसाय घरकाम, रा. राजगड ता. मुल जि. चंद्रपूर

मार्गदर्शन करणारे अधिकारी

१) श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर २) श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ३) श्री. विजय राठोड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुल

कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार

पोलीस स्टेशन मुल १) सपोनि सुरेश कन्नाके २) पोहवा. नरेश कोडापे ब.नं. १८३ ३) पोअं. दिलीप आदे ब.नं. २७१० ४) पोअं नरेंद्र वाकडे ब.नं. २६२३ ५) पोअं. प्रकाश चिकराम ब.नं. २३९७ ६) पोअं शंकर बोरसरे ब.नं. १२३२ ७) सायबर सेल चंद्रपूर

घटना तारीख व वेळ दि. २६/०६/२०२६ चे १०/०० वा.ते १५/३० वा. दर.

दाखल तारीख व वेळ दि. २८/०६/२०२६ चे १४/१८ वा.

घटनास्थळ मौजा राजगड ता. मुल ०८ किमी पुर्व

आरोपी नाव १) प्रदिप तुळशिराम उंदीरवाडे वय ६१ वर्ष, व्यवसाय किराणा दुकान, रा. राजगड, ता. मुल जि. चंद्रपूर पाहिजे आरोपी २) तथागत शागीर निमगडे वय २७ वर्ष रा. विरई पो. फिस्कुटी ता. मुल जि. चंद्रपूर

मिळून आलेला माल एक १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन किंमत १,४९,५०० रू. चा मुद्देमाल

*हकीकत:-*

याप्रमाणे आहे कि, दिनांक २८/०६/२०२६ रोजी फिर्यादी श्रीमती वंदना प्रेमानंद सोरते वय ६७ वर्ष व्यवसाय घरकाम, रा. राजगड ता. मुल जि. चंद्रपूर यांनी रिपोर्ट दिली की, त्यांना डाव्या डोळ्याने कमी दिसत असल्याने डोळ्याच्या उपचारासाठी रुग्णालयात जाणे असल्याने फिर्यादीची लहान नातीण स्नेहा सोरते ही धानोरा गडचिरोली येथे नातेवाईकांकडे गेली असल्याने फिर्यादी घरी एकटी असल्यामुळे तिने तिची मोठी नातीन व तिचा पती आरोपी नामे तथागत निमगडे यांना घरकामासाठी बोलावून घेतले होते. तेव्हापासुन आरोपी तथागत निमगडे हा आपल्या पत्नीसोबत फिर्यादी यांच्या घरीच राहत होता. दिनांक २६/०६/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता दरम्यान फिर्यादी ही गडचिरोली येथे डॉक्टरांना डोळा दाखविण्यास गेली व दुपारी १५.३० वाजता घरी परत आली. तेव्हा तथागत निमगडे याने त्याचे वडीलांची तब्येत खराब झाली असे सांगून पत्नीसह आपले गावी विरई येथे निघून गेला व दिनांक २७/०६/२०२६ रोजी सकाळी फिर्यादीच्या मोठी नातीन सौ. रोहीणी तथागत निमगडे हीने फोन करून तिला सांगितले की, तिचा पती तथागत निमगडे हा गाडी घेण्यासाठी जात आहे तेव्हा फिर्यादीस त्याचेवर संशय आला असता फिर्यादीने घरी दागीने ठेवलेली डब्बी तपासली असता त्यामध्ये ठेवलेली सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मिळून आली नाही, त्यामुळे फिर्यादीने तिच्या नातजावई तथागत निमगडे, रा. विरई, ता. मूल याच्यावर सोन्याची चैन चोरी केल्याचा संशय व्यक्त करून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणे तोंडी रिपोर्ट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

मूल पोलीस स्टेशन हद्दीतील राजगड, ता. मूल येथील ६७ वर्षीय फिर्यादी श्रीमती वंदना प्रेमानंद सोरते यांच्या घरातील अंदाजे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक करण्यात मूल पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे.

*तांत्रिक तपासातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत*

गुन्ह्याचा तपास करताना आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल, चंद्रपूर यांच्याकडून आरोपीचे SDR CDR प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामधून आरोपी तथागत निमगडे याचा अटक आरोपी प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे याच्याशी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आरोपी तथागत शागीर निमगडे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली अंदाजे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली.

*एक आरोपी अटकेत; मुख्य आरोपी फरार*

सदर गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा आरोपी प्रदीप तुळशीराम उंदीरवाडे, वय ६१ वर्ष, रा. राजगड, ता. मूल, जि. चंद्रपूर यास अटक करण्यात आली आहे. तर सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी तथागत शागीर निमगडे, रा. विरई, पो. फिस्कुटी, ता. मूल, जि. चंद्रपूर हा सध्या फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून, त्यास लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सदर कारवाई श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. विजय राठोड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुल यांच्या मार्गदर्शनात, पोलीस स्टेशन मुल येथील तपास पथक सपोनि. सुरेश कन्नाके, पोहवा. नरेश कोडापे ब.नं. १८३, पोअं. दिलीप आदे ब. न. २७१०, पोअं नरेंद्र वाकडे ब. नं २६२३, पोअं. प्रकाश चिकराम ब.नं. २३९७ ,पोअं शंकर बोरसरे ब न १२३२ यांनी केली असून, तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page