Sunday, August 30, 2026
spot_img
HomeChandrapurअनुसूचित जाती बहिणींच्या साथीत ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात आ....

अनुसूचित जाती बहिणींच्या साथीत ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजपा महानगर कार्यालयात सामूहिक श्रवणय संवाद आणि सामाजिक सहभागाचा संदेश

अनुसूचित जाती बहिणींच्या साथीत ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात

 आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजपा महानगर कार्यालयात सामूहिक श्रवणय संवाद आणि सामाजिक सहभागाचा संदेश

*Jyotsna Wankhede*: अनुसूचित जाती समाजातील माता-भगिनींना सोबत घेऊन सामाजिक संवाद आणि जनजागृतीला बळ देण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर ‘अनु. जाती बहिणींच्या साथीत मन की बात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित माता-भगिनींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, अनु. जाती मोर्चा अध्यक्षा विमल कातकर, महामंत्री नीलिमा वनकर, अल्पसंख्याक अध्यक्ष कौसर खान, मालखेडे सर, अनिता झाडे, नूतन मेश्राम, सारिका उराडे, संतोष रामटेके, भाविक पेटकर, हेमलता खोब्रागडे, भावना बरसागडे, सपना सातपुते, कल्पना दुधे, दीप्ती मालखेडे, वंदना गेडाम, सुनीता जोंधळे, गावंडे ताई, छाया चिवंडे, सविता ब्राम्हणे, राघिणी चुनारकर, अनु. जाती समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. जोरगेवार यांच्या सूचनेनुसार आयोजित या उपक्रमातून अनुसूचित जाती समाजातील महिला भगिनींशी संवाद साधत त्यांचा सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक उपक्रम, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, जनसहभागातून घडणारे सकारात्मक बदल आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. या कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करत उपस्थितांनी विविध विषयांवरील विचार जाणून घेतले.

यावेळी उपस्थित माता-भगिनींनी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करताना देशातील विविध भागांत सुरू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांची माहिती घेतली. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आणि त्यांचा राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि जनजागृती यांना प्राधान्य देण्यात आले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून संवादाच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page