Sunday, August 30, 2026
spot_img
HomeShegao*शेगांव पोलीसांनी पोस्को च्या अज्ञात आरोपीच्या २४ तासात शोध घेवून केली अटक*

*शेगांव पोलीसांनी पोस्को च्या अज्ञात आरोपीच्या २४ तासात शोध घेवून केली अटक*

*शेगांव पोलीसांनी पोस्को च्या अज्ञात आरोपीच्या २४ तासात शोध घेवून केली अटक*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलिस स्टेशन शेगांव हद्दीत दिनांक २९/०८/२०२६ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान टेमुर्डा येथे पिडीत मुलगी शाळेत जात असताना एका बाईक चालक याने सदर पिडीतेस लिफ्ट देतो म्हणुन बाईक वर बसविले समोर जावुन तिची छेड काढली. त्यामुळे सदर पिडीत घाबरली व चालत्या गाडी वरून उडी घेतली त्यामुळे पिडीतेला जखम झाली नंतर अज्ञात आरोपी गाडी चालक तेथुन पळून गेला. त्या अन्वये पोलीस स्टेशन शेगांव येथे अप क्र. २६५/२०२६ कलम ७४ बी. एन. एस. सह कलम १२ बा. ल. अ. प्र. कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यात शेगांव पोलीसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध कोणतीही माहीती नसताना टेमुर्डा, वरोरा तसेच ईतर ठिकानी अज्ञात आरोपीचा शोध घेवून व सर्व तांत्रीक बाबी तपासुन व खबरी कडुन माहीती घेवुन अत्यंत कौशल्य पुर्ण तपास करून २४ तासाच्या आत अज्ञात आरोपीचा शोध लावुन आरोपी नामे गणेश बाळूराम कुमावत, वय ३४ वर्ष, ह. मु. बोर्डा, ता. वरोरा, राह. बासडी खुर्द, जि. जयपुर, राज्य राजस्थान याला ताब्यात घेवून आरोपी याला सदर गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली असता नमुद आरोपी याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व आरोपी याचेकडुन गुन्ह्यात वापरलेली टु व्हीलर गाडी जप्त करून आरोपी याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री आयुष नोपानी भापोसे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर ठोसरे मा. यांचे मार्गदर्शनात सपोनी योगेंद्रसिंग यादव ठाणेदार पोलीस स्टेशन शेगांव, पोउपनी दिलीप पोले, पोउपनी सुमित कांबळे, सफौ दिलीप सुर, पोहवा अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार, पोशी प्रशांत गिरडकर यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page