Sunday, October 4, 2026
spot_img
HomePolice*गोवंशाची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्री करणाऱ्यावर रामनगर पोलिसांचा छापा. 11 गोवंशांना...

*गोवंशाची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्री करणाऱ्यावर रामनगर पोलिसांचा छापा. 11 गोवंशांना जीवदान. ₹ 1,73,192/- किंमतीचा माल जप्त.*

*गोवंशाची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्री करणाऱ्यावर रामनगर पोलिसांचा छापा. 11 गोवंशांना जीवदान. ₹ 1,73,192/- किंमतीचा माल जप्त.*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

चंद्रपूर शहरात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणारे लोकांचा शोध घेऊन त्यांचेविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके मॅडम यांना सूचना व मार्गदर्शन केले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अशा प्रकारचे लोकांची माहिती काढून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार गोवंशांची कत्तल करणारे व गोमांस विक्री करणारे लोकांबाबत माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, तुकुम तलाव येथे राहत असलेले इसम 1) अब्दुल अनीस अब्दुल नबी कुरेशी, वय 46 वर्ष, 2) नफान अब्दुल अनीस कुरेशी वय 21 वर्ष, दोन्ही रा. रा. तुकुम तलाव, चंद्रपूर हे त्यांचे राहते घरात अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशांना डांबून ठेवले असून तो त्यांची कत्तल करून गोमांसाची घरात विक्री करत आहे. त्यानुसार लागलीच पोलीस पथकाने त्याबाबत छाप्याचे नियोजन करून त्यांचे घरावर पशुवैद्यकीय अधिकारी यांचेसह जाऊन पंचासमक्ष 04/10/2026 रोजी छापा घातला असता त्याचे घरात गोमांस, गोमांस विक्री करण्यासाठी लागणारे साहित्य वजनकाटा, गोमांस तोडण्यासाठी लागणारा सत्तुर, लाकडी कुंडा तसेच अकरा गोवंश जातीची जनावरे (11 नर जातीचे गोरे) असे एकूण ₹ 1,73,192/- किंमतीचा माल मिळून आल्याने त्यांचेवर छापा घालून ती पंचासमक्ष जप्त करून त्याचेवर पोलीस स्टेशन रामनगर येथे महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5 (क), 9 प्राण्याला निर्दयतेने वागणूक देणे प्रतिबंध अधि. 1959 कलम 11 (1) (ड) तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा सन 2006 – 31,63 अन्वये अपराध केला आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, सुरज शेडमाके, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page