Monday, October 26, 2026
spot_img
HomeChandrapurतृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आ. किशोर जोरगेवार

तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. किशोर जोरगेवार

तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. किशोर जोरगेवार

डॉ. सानवी जेठवानी यांचे चंद्रपूर भाजप महानगर कार्यालयात स्वागत, तृतीयपंथी समुदायातील सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

*Jyotsna Wankhede*:

      तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी त्यांना समान संधी, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तृतीयपंथी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सानवी जेठवानी यांचे श्री माता महाकालीच्या पावन नगरी चंद्रपूर येथे आगमन झाले. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित स्वागत कार्यक्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी तृतीयपंथी समुदायाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

          यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जेष्ठ नेते प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेविका सविता कांबळे, राज कचारे, साजन बहोरिया, एस.आय.आर. प्रमुख सुमित बेले, राकेश बोमनवार, हेमलता खोब्रागडे, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार आदिंची उपस्थिती होती.

           तृतीयपंथी समुदायातील नागरिकांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा आणि प्रगती करण्याचा समान अधिकार आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी समाजाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक भेदभाव दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

           यावेळी डॉ. सानवी जेठवानी यांनी तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सामाजिक पुनर्वसन या विषयांवर आपले विचार मांडले. तृतीयपंथी व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि समाजात समानतेची भावना रुजावी, यासाठी कल्याण मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तृतीयपंथी समुदायाच्या समस्या सोडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चंद्रपूर येथील तृतीयपंथी समुदायातील अनेक सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सदस्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणे, हीच पक्षाची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page