*एक दिवसीय कार्यशाळा (Workshop) संपन्न*

*Jyotsna Wankhede*: त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुरच्या वतीने भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपूर येथे रविवार दिनांक 25/10/2026 ला एक दिवसीय कार्यशाळा पार पड़ली. *प्रतिक्रियात्मक मन” या विषयावर *धम्मचारी पद्मरत्न* यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. भोजनअवकाशानंतर गटचर्चा झाली. मेश्रामताई, कोट्टावारताई, भैयालाल मेश्राम आणि वनकर साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. शुरुवातीला वनिता नगराले आणि निता कोरडे यांनी त्रिशरण पंचशील आणि बुद्धपूजेचे नेतृत्व केले. धम्ममित्र दर्शना रामटेके यांनी मैत्रीभावना ध्यान सराव करुन घेतला. सूत्रसंचालन धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले. धम्मपालन गाथेने कार्यशाळा संपन्न झाली.










