Wednesday, November 18, 2026
HomeWarora*महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस कलम ३७६ कायद्या अंतर्गत जन्मठेपाची शिक्षा*
spot_img

*महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस कलम ३७६ कायद्या अंतर्गत जन्मठेपाची शिक्षा*

*महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस कलम ३७६ कायद्या अंतर्गत जन्मठेपाची शिक्षा*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक २९/०४/२०२१ रोजी सकाळी १९/१५ ते २०/०० वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी ही फोरव्हीलर गाडीवर आरोपीसह फिर्यादीचे गांवी वाढवणा येथे जात असता खैरी येथून वाढवणा येथे न जाता माढेळी मार्ग नागरी माढेळी चे २ ते ३ किलोमीटर अंतरावर गाडी घेवुन जावुन तिला धमकी देवुन मारहान करून तिचेवर लैंगिक अत्याचार केला. अशा फिर्यादीचा रिपोर्ट वरून पोलीस ठाणे वरोरा येथे तत्परतेने गुन्हा रजिस्टर क. ३५३/२०२१ कलम ३७६,३७६(२)(एन)(इ),३२३,५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले.
*मा. न्यायालयचा निकाल*
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. अतुल के. शहा अतिरिक्त सत्र न्यायालय वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्‍ता गोविंद उराडे यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीस दिनांक २९/१०/२०२६ रोजी आरोपीस कलम ३७६(२)(एन) भादवी मध्ये जन्मठेपाची शिक्षा व ५००० रू दंड दंड न भरल्यास ३ महीण्याचा साधा कारावास तसेच ३७६ भादवी मध्ये ७ वर्षाची शिक्षा व ४००० रू दंडाची शिक्षा, कलम ३२३ भादवी मध्ये १ वर्षाची शिक्षा, व १००० रू दंड, कलम ५०६ भादवी मध्ये १ वर्षाची शिक्षा व १००० रू दंडाची शिक्षा देण्यात आली.
*तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी*
– तपासी अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव पोलीस स्टेशन वरोरा
– सरकारी अभियोक्‍ता अॅड गोविंद उराडे
– कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार धनराज करकाडे ब.न. २०४० पोलीस स्टेशन वरोरा
– दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर
सदर कामगीरी मा. श्री. आयुष नोपाणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page