Wednesday, November 18, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपूरच्या लॉटिंग गँगच्या मजुरांना दिलासा; एप्रिल ते ऑगस्टची थकीत मजुरी प्राप्त, सप्टेंबर-ऑक्टोबरची...
spot_img

बल्लारपूरच्या लॉटिंग गँगच्या मजुरांना दिलासा; एप्रिल ते ऑगस्टची थकीत मजुरी प्राप्त, सप्टेंबर-ऑक्टोबरची मजुरीही उपलब्ध

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मजुरांच्या वेदनेची घेतली दखल; दिवाळीपूर्वी थकीत मजुरीचा प्रश्न मार्गी

बल्लारपूरच्या लॉटिंग गँगच्या मजुरांना दिलासा; एप्रिल ते ऑगस्टची थकीत मजुरी प्राप्त, सप्टेंबर-ऑक्टोबरची मजुरीही उपलब्ध

आ.मुनगंटीवार यांचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र; वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा


*Jyotsna Wankhede*: दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळवणारा असतो; मात्र ज्या कष्टकरी हातांच्या घामावर संपूर्ण कुटुंबाचा संसार उभा असतो, त्याच हातांना आपल्या मेहनतीचा मोबदला मिळण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागणे, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. मजुरांच्या घरातील चिमुकल्यांच्या दिवाळीचा आनंद आर्थिक विवंचनेमुळे हिरावला जाऊ नये, त्यांच्या कष्टाचे मोल त्यांना सणासुदीच्या दिवसांत मिळावे, या संवेदनशील भावनेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील लॉटिंग गँगच्या मजुरांच्या प्रश्नात तातडीने लक्ष घातले. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची थकीत मजुरी मिळण्यासोबतच सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या पुढाकारामुळे मजुरांच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेला विराम मिळाला असून, दिवाळीच्या उंबरठ्यावर त्यांच्या घरात आनंदाचा दिवा उजळण्यास मोठा आधार मिळाला आहे.

बल्लारपूर येथील वाहतूक विपणन विभागांतर्गत डेपोमध्ये कार्यरत लॉटिंग गँगच्या मजुर मजुरी थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक विवंचनेचे सावट होते. दसऱ्यासारखा सणही मजुरीविना गेल्याने आता दिवाळी तरी अंधारात जाणार नाही ना, अशी मजुरांना चिंता भेडसावत होती.आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांनी आपली अडचण भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांना सांगितली. श्री.दुबे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही बाब तात्काळ आणून दिली. मजुरांच्या कष्टाचा मोबदला हा त्यांचा हक्क आहे आणि त्यांच्या घरातील सणाचा आनंद हिरावला जाऊ नये, या संवेदनशील भूमिकेतून आ. मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला. वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून तसेच वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील थकीत मजुरी तातडीने अदा करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही वेळेत मिळावी, यासाठी आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या या पुढाकारामुळे थकीत मजुरीची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली असून, दिवाळीच्या उंबरठ्यावर मजुरांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

मजुरांच्या हाताला काम मिळणे जितके महत्त्वाचे, तितकाच त्यांच्या कष्टाचा मोबदला वेळेवर मिळणेही महत्त्वाचे आहे. कारण त्या मजुरीवरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, घरातील चूल आणि कुटुंबाच्या छोट्या-मोठ्या गरजा अवलंबून असतात. सणासुदीच्या काळात हातात पैसे नसल्याने कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडू नये, याची जाणीव ठेवून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. मजुरांच्या वेदनेची दखल घेत प्रशासकीय स्तरावर केलेल्या या हस्तक्षेपामुळे त्यांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळाला आहे. कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा दिवा तेवत राहावा, हीच या पुढाकारामागील भावना आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page