Wednesday, November 18, 2026
HomeFraud*येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर ने फसवणूक केलेल्या गुन्ह्याचा...
spot_img

*येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर ने फसवणूक केलेल्या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे तपास सुरू*

*येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर ने फसवणूक केलेल्या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे तपास सुरू*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

फिर्यादी नामे चंद्रकिशोर नामदेव मांडवकर वय 52 वर्ष, रा. आनंदवन चौक व्दारकानगरी बोर्डा ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचे तक्रारीवरून येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर रजि नं. CHD/CHD/RSR/CR130/2023-24 चे संचालक अपेक्षा स्नेहदिप जोब, अतुल सोपन बनसोड, दुर्गा गौरांग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी  रुषी वासेकर, तेजस्विनी अतित्या लोखंडे, प्रिती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी, विकास देवराव दुधबळे, यांनी दिनांक 23/10/2023 मध्ये चंद्रपूर येथे स्थापना करून स्थानिक लोकांना एजंट, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांची  नेमणुक करून एजंट व स्वतः स्थानिक गुंतवणुकदारांना विवीध योजना मध्ये गुंतवणूक केल्यास खुप फायदा होईल याकरीता खालील प्रमाणे योजना येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर 1) बचत खाते वर्षी व्याज 4 टक्के 2) फिक्स डिपाजीटला वार्षीक व्याज 9.75 टक्के 3) TDS टाईम डिपाजीत योजना मध्ये 1399/- रुपये 22 महिने भरल्यानंतर 24 व्या महिन्यात 84174/- रुपये मिळणार योजना 68000/- रुपये एकदा भरा आणि 24 महिन्यानंतर 84174/- रुपये मिळवा 4) युवा बचत धन योजना व बचत धन योजना 5) MIS मासीक बचत 14145/- रुपये तिमाह, 28290/- रुपये सहामाही, 56580/- रुपये वार्षीक भरल्यानंतर 452928/- रुपये दैनिक ठेव योजनाचा लाभ मिळणार अश्या विविध प्रकारच्या योजना सुरू करून आमीष दाखवुन त्यांचे 8,84174/- रुपये व इतर 1331 गुंतवणूकदाराचे 8,51,11,664/- रुपये संचालक /अध्यक्ष आरोपीतांनी एकुण 8,59,95,838/- रुपये ची अफरातफर करून फसवणुक केल्याने पोलीस स्टेशन रामनगर अप क्र. 1179/2026 भारतीय न्यास संहीता 318(4), 316(5), 316(2), 3(5) सहकलम 3 MPID ॲक्ट 1999 अन्वये गुन्हा नोंद असुन तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे.

सदर गुन्ह्यातील येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर रजि नं. CHD/CHD/RSR/CR130/2023-24 चे वरिल संचालक आरोपी यांनी गुंतवणुकदार यांचे कडुन आरोपीतांनी पैसे घेवुन त्यांना संचालक यांनी सांगीतले प्रमाणे पैश्याचा परतावा न करता 8,59,95,838/- रुपयाची फसवणूक केली आहे.

तरी 8,59,95,838/- रुपये मध्ये ज्या गुंतवणूकदाराची फसवणूक झालेली आहे. अशा गुंतवणूकदारांच्या रक्कमेच्या याद्या तयार करणे सुरू आहे. तरी ज्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळाली नाही अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीचे कागदपत्र (गुंतवणूकचे सर्टीफिकेट, रक्कम जमा पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहीजे त्या राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुकची झेरॉक्स प्रत) इ. माहीतीसह महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एम पी आय /प्र.क्र. 09/पोल-11 दिनांक 25/02/2019 अन्वये गुंतवणूकदाराचे परीशिष्ट- 1 प्रमाणे फार्म भरून देणे करीता आर्थिक गुन्हे शाखा, (पोलीस ठाणे दुर्गापुर परिसर) पोलीस अधिक्षक कार्यालय चंद्रपूर येथे यावे. असे आवाहन श्री. अतुल कावळे सहा. पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर *मो नं. 7588881081*यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page