*पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत कापूस चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून ५,२३,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल *अपराध क्र. १०६७/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता* अन्वये नोंद असलेल्या कापूस चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना दि. ०१/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ही चोरी
१) सागर लक्ष्मण चव्हाण, वय २९ वर्षे, रा. नागरी ता. वरोरा जि. चंद्रपूर
२) अमोल महादेव जाधव, वय २२ वर्षे, रा. दहेगाव सेलू, ह.मु. हिंगणघाट जि. वर्धा
व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी मिळून केली आहे.
वरील तिघांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्ह्यात चोरी केलेला कापसापैकी *२.५ क्विंटल कापूस किमती २३,००० रुपये व कापूस चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली झायलो कंपनीची गाडी किमती ५,००,००० रुपये असा एकूण ५,२३,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त* करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस स्टेशन वरोरा येथे सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा रजनीकांत पुठठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं विठ्ठल काकडे, पोशी/ दिनेश अराडे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी ही कारवाई केली आहे.