*पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणारे ०६ आरोपी ताब्यात घेऊन रु. ३५,१००/- रोख जप्त – स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कार्यवाही*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. ०१/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम *पारधी टोला, चिनोरा परिसरात विकास काळे याचे राहते घरात ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळत आहेत.*
अशा माहितीवरून पारधी टोला, चिनोरा परिसरात विकास काळे याचे राहते घरी सापळा रचून रेड कारवाई केली असता खालील ६ जण जुगार खेळताना मिळून आले:
१) राजू शेंडे
२) विकास काळे – रा. पारधी टोला, चिनोरा
३) कैलास घुमे
४) आशीष ढोक
५) उमेश येटे
६) निखील दानव
त्यांच्याकडून *रोख रक्कम रु. ३५,१००/- व ५२ ताशपत्ते जप्त* करण्यात आले आहेत.
सदर आरोपींवर *पोलीस स्टेशन वरोरा येथे कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद* करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा/ प्रफुल गारघटे, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा सुभाष गोहोकार, पोअं सुमित बरडे, पोअं विठ्ठल काकडे, पोशी/ मिलींद टेकाम, पोशी/ दिनेश अराडे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी ही कारवाई केली आहे.