Wednesday, November 18, 2026
HomeCourt*अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व ६,०००/-...
spot_img

*अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व ६,०००/- रुपये दंडाची शिक्षा*

*अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या २६ वर्षीय आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व ६,०००/- रुपये दंडाची शिक्षा*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मा. न्यायाधीश श्री. पी. एम. गुप्ता यांनी पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात एका नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि एकूण 6,000/- रुपये दंडाची कठोर शिक्षा ठोठावली आहे.

दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी सुमारे 7.00 ते 7.30 वाजताच्या सुमारास, गोंडपिपरी तालुक्यातील 6 वर्षे 11 महिन्यांची अल्पवयीन मुलगी खेळत असताना आरोपी महेश गजानन मोहुर्ले वय 26 वर्षे याने तिचा हात पकडून जबरदस्तीने स्वतःच्या घरात ओढून नेले. आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद करून पीडित चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले व त्यांनी दरवाजा उघडून बालिकेची सुटका केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धाबा येथे गुन्हा क्र. 5/2022, कलम 376(ए)(बी), 366, 354(ड), 323, 506 भा.दं.वि. सहकलम 4, 6, 8 पोक्सो कायदा तसेच अ.जा./अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. राजा पवार यांनी न्यायालयात (विशेष सत्र खटला क्र. 37/2022) दोषारोपपत्र दाखल केले होते.

दिनांक 03 नोव्हेंबर 2026 रोजी सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे व साक्षीदार ग्राह्य मानून मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. पी. एम. गुप्ता यांनी आरोपी महेश गजानन मोहुर्ले यास दोषी ठरवून खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

– *कलम 376 (ए), (बी) भारतीय दंड संहिता (IPC) व कलम 6, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा, 2012 :*

    – 20 वर्षे सक्तमजुरी आणि 5,000/- रुपये दंड; दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास.

– *कलम 366, भारतीय दंड संहिता (IPC):*

    – 3 वर्षे सक्तमजुरी आणि 1,000/- रुपये दंड; दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास.

– *कोर्ट विद्यमान:* श्री. पी. एम. गुप्ता, मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, चंद्रपूर

– *तपासी अधिकारी:* श्री. राजा पवार, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा

– *सरकारी अभियोक्ता:* अॅड. श्री. सुधाकर देगावार, सहायक सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर

– *कोर्ट पैरवी अधिकारी:* सफौ/४५२ श्री. सुधाकर आत्माराम कोहपरे, पो.स्टे. धाबा

– *दत्तक अधिकारी:* श्री. विरेंद्र केदारे, सपोनि पो.स्टे. धाबा

– *सहकार्य:* दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर

सदर कामगिरी श्री. आयुष नोपाणी (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर), मा. श्री. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) व उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page