Wednesday, November 18, 2026
HomeFestivalsआमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेला ६६८ स्पर्धकांचा...
spot_img

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेला ६६८ स्पर्धकांचा प्रतिसाद, विजेत्यांचा गौरव. भाजप महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेला ६६८ स्पर्धकांचा प्रतिसाद, विजेत्यांचा गौरव.

भाजप महानगर कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

*Jyotsna Wankhede*: गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि गणेशोत्सवातील उत्साह अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला  तब्बल ६६८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.. आज भाजप महानगर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नामदेव डाहुले, निलिमा वनकर, अरुन तिखे, संजय बोरघाटे, सुमित बेले, विनोद पेन्लीवार, शालु कन्नोजवार, आदिंची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवातील घरगुती सजावटीच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हाती घेतला. प्रत्येक घरातील गणेशोत्सव सजावटीमागे असलेली कल्पकता, मेहनत आणि भक्तिभाव यांची दखल घेत नागरिकांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी घेतली. याच संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेत ६६८ स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या सजावटींचे छायाचित्र आणि व्हिडिओ सादर केले.
गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच आपल्या संस्कृती, परंपरा आणि कलात्मकतेचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. अशा उत्सवांच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढावा, स्थानिक कलाकार आणि कुटुंबांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आमदार जोरगेवार यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने मिळालेला सहभाग हा या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाचे द्योतक ठरला.
या स्पर्धेत संदीप तोहगावकर यांनी प्रथम क्रमांक, मंगेश सोम अलोन यांनी द्वितीय क्रमांक, श्रुती साखरकर यांनी तृतीय क्रमांक, विलास मधुकर कुकडे यांनी चतुर्थ क्रमांक, तर प्रितम कुंभारे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. भाजप महानगर कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अशा सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळते. चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी यापुढेही अशा स्पर्धा व उपक्रम आयोजित करण्यावर भर राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहणपर बक्षिस देण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page