Wednesday, November 18, 2026
HomeChandrapurचंद्रपूरच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या होमगार्ड जवानांची चौकाचौकांत पुनर्नियुक्ती करा - आ....
spot_img

चंद्रपूरच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या होमगार्ड जवानांची चौकाचौकांत पुनर्नियुक्ती करा – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या होमगार्ड जवानांची चौकाचौकांत पुनर्नियुक्ती करा – आ. सुधीर मुनगंटीवार

शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्ड जवानांची पूर्वीप्रमाणे नियुक्ती करण्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे आ.मुनगंटीवार यांची मागणी

वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी होमगार्ड जवानांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण; नियमित वाहतूक नियमनासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन


*Jyotsna Wankhede*: शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्यात होमगार्ड जवानांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन, वाहनांची शिस्त राखणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या होमगार्ड जवान प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे वाहतुकीला शिस्त लागते आणि नागरिकांनाही मोठा दिलासा मिळतो. त्यामुळे चंद्रपूर महानगरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये होमगार्ड जवानांची आवश्यकता अनन्यसाधारण असून, त्यांची पूर्वीप्रमाणे तात्काळ पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, चंद्रपूर महानगरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि वाहनांची कोंडी होऊ नये, या उद्देशाने यापूर्वी होमगार्ड जवानांची वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियोजनबद्ध उपस्थितीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त प्राप्त झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरातील विविध चौकांमध्ये नियुक्त करण्यात आलेले होमगार्ड जवान कर्तव्यावर दिसून येत नसल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातांची शक्यताही नाकारता येत नाही.होमगार्ड जवान हे केवळ वाहतुकीचे नियमन करणारे कर्मचारी नसून, शहराच्या दैनंदिन सार्वजनिक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. उन्हाची तीव्रता असो अथवा पावसाचा मारा, रस्त्यांवरील वाढती वाहनांची वर्दळ असो किंवा सण-उत्सवांच्या काळातील गर्दी, अशा प्रत्येक परिस्थितीत हे जवान कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या दक्षतेमुळे वाहतुकीला दिशा मिळते, नागरिकांचा वेळ वाचतो आणि रस्त्यांवरील सुरक्षिततेला बळ मिळते. त्यामुळे त्यांच्या सेवेचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी त्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून चंद्रपूर महानगरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये होमगार्ड जवानांची पूर्वीप्रमाणे तात्काळ पुनर्नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या माध्यमातून नियमितपणे वाहतूक संचालनाचे काम व्हावे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.शहराच्या सुरक्षिततेसाठी होमगार्ड जवानांचे योगदान अनिवार्य आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष सेवेचा योग्य उपयोग करून घेणे ही प्रशासनाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page