*चैनीच्या वस्तूंच्या मोहापायी सर्व्हिस सेंटरमधील दुचाकींच्या बॅट-या चोरणा-या तीन आरोपींना रामनगर पोलीसांनी केले गजाआड. रूपये १,४१,०००/- किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
तक्रारदार सौरव अशोक पांडे, मॅनेजर, पवनसुत होंडा सर्व्हिस सेंटर, चंद्रपूर यांनी पो.स्टे. ला तक्रार दिली की, दि. २१/१०/२०२६ रोजी १६.०० ते दि. २२/१०/२०२६ रोजी १५.०० वा.चे दरम्यान त्यांचे सर्व्हिस सेंटर येथील गोडावूनमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या एकूण ४७ दुचाकींच्या बॅटरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्यावरून पो.स्टे. रामनगर येथे अप. क्र. १२२३/२०२६ कलम ३०५, ३३१(२), ३३१(३), ३(५) नुसार गुन्हा नोंद झाला होता. तसेच शिवशंकर होंडा शोरूम येथे देखील अशाच प्रकारे ७९ बॅट-या चोरीबाबत अपराध क्र. १२२९/२०२६ कलम ३०३(२) भा. न्या. सं. नुसार गुन्हा दाखल होता.
सदर दोन्हीही गुन्ह्यांचे स्वरूप व आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत ही एकच असल्याने ते दोन्ही आरोपी एकच असावेत असा दाट संशय आल्याने सदर आरोपी निष्पण्ण करून त्यांचा शोध घेऊन बॅट-या हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना मा. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी पो.स्टे. रामनगर शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार चोरी करणा-या व्यक्तीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या तीन मुलांनी केला असून ते बंगाली कॅम्प परिसरात दुचाकीच्या बॅट-या विक्रीचा प्रयत्न करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून आरोपी १) तेजल रत्नाकर गेडाम, वय- २१ वर्षे, धंदा- शिक्षण, रा. इंदिरानगर, वाल्मीक चौक, चंद्रपूर, (२) अदित्य मारूती रामटेके, वय-२० वर्षे, धंदा शिक्षण, रा. मसाळा, तुकुम, ता. जि. चंद्रपूर व (३) सुजल अविनाश रत्नपारखी, वय- २२ वर्षे, धंदा शिक्षण, रा. बाबूपेठ, फुले वार्ड, चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन महागड्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्याच्या मोहापायी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचेकडून चोरीच्या एकूण ६३ बॅट-या किंमत १,४१,०००/- रूपयेच्या जप्त केल्या असून दोन गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचेकडून आणखी मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्लूटी साखरे यांनी केली आहे.