Wednesday, November 18, 2026
HomeJanjagrutiलोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ अभियानासाठी चंद्रपूर महानगर भाजपचे व्यापक नियोजन २...
spot_img

लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ अभियानासाठी चंद्रपूर महानगर भाजपचे व्यापक नियोजन २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रम, चंद्रपूर महानगर भाजप कार्यालयात पदाधिकार्यांची बैठक

लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ अभियानासाठी चंद्रपूर महानगर भाजपचे व्यापक नियोजन

२ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रम, चंद्रपूर महानगर भाजप कार्यालयात पदाधिकार्यांची बैठक

*Jyotsna Wankhede*: भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणार्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर महानगर भाजप कार्यालयात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहून अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, महानगर प्रभारी अर्चना देहणकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, ज्येष्ठ नेते विजय राउत, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, महामंत्री रविंद्र गुरुनुले, मनोज पाल, नामदेव डाहुले, विधानसभा प्रमूख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर वाढई, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, रवि जोगी, विनोद खेवले, ओमेश आयलु, प्रविण गिलबिले, आदिंची उपस्थिती होती.
अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे जतन आणि अराजकतेविरोधातील जनजागृती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांची व्याप्ती वाढविणे, समाजातील विविध घटकांपर्यंत अभियानाचा संदेश पोहोचविणे तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात विविध सूचना मांडल्या. प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी निश्चित करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि नियोजनानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे यावर भर देण्यात आला. अभियान केवळ पक्षस्तरावर मर्यादित न राहता त्याचा संदेश व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचावा, यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page