Tuesday, September 1, 2026
spot_img
Homeबल्लारपूरपाली बुद्ध विहार समितिचे पदाधिकारी बुद्धगयेला रवाना

पाली बुद्ध विहार समितिचे पदाधिकारी बुद्धगयेला रवाना

पाली बुद्ध विहार समितिचे पदाधिकारी  बुद्धगयेला रवाना

श्रेयश वानखेडे:
बुध्दगया महाबोधी महाविहार ब्राम्हणांपासुन मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी भिक्षुनिवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर चे पदाधिकारी, सदस्य आज पहाटे ४ वाजता बुध्दगयाला रवाना झाले. याअनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दि. २८ मार्च ला कार्यक्रम आयोजित करन्यात आला होता. याप्रसंगी  पंचशील दुपट्टा, पंचशील ध्वज, गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार देवरावजी मेश्राम, भाऊराव लोखंडे, बोरकरताई, अर्पणा खोब्रागडे, भालेराव काकु, एड.पवन मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंदोलनात ताराचंद थुल, तुळशीदास खैरे, नरेंद्र जानगे, अंबादास मानकर, गोकुल वाघमारे, परमानंद भडके, प्रकाश देवगडे, जयदास भगत, रविचंद्र खोब्रागडे, परेकर, नयन उमरे हे सहभागी होणार असून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धम्ममित्र भास्कर भगत यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन धम्ममीत्र संपत कोरडे यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page