Sunday, May 31, 2026
HomeSanghtanaराष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जंतर-मंतर येथे धरणा
spot_img

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जंतर-मंतर येथे धरणा

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जंतर-मंतर येथे धरणा

श्रेयश वानखेडे:

राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेलफेयर असोसिएशन तेलंगणा,आंध्रप्रदेश यांच्या संयुक्तपने 2 एप्रिल 2025 ला जंतर -मंतर नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते दुपारी  2 पर्यंत येथे धरणा आंदोलन करण्यात करण्यात येणार आहे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वंतःत्र मंत्रालय स्थापित करण्यात यावे, आरक्षणातील 50%मर्यादा हटविण्यात यावी, 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात आली नाही ती वाढविण्यात यावी,  तेलंगणातील वाढविलेले 42 टक्के ओबीसी आरक्षण 9 व्या सूचित टाकण्यात यावे,  संविधानाच्या कलम 243 डी (6) व फलम 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसींना 27 टक्के आरक्षणाचा कायदा करावा,केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गातील राखीव 27% जागा पूर्णतः  भरण्यात याव्यात, मंडल आयोग, आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्ष वयानंतर पेंशन योजना लागू करण्यात यावी. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा. ओबीसीसाठी लोकसभा व विधानसभा असे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करण्यात यावेत, ओबीसी प्रवर्गाचा अॅट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्टगाव योजना लागू करण्यात यावी. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबी व एलएलएम च्या ऑलइंडिया कोट्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण देण्यात यावे. केंद्र सरकारने वार्षिक अंदाजे पत्रक तयार करतांना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गाकरिता लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी,  या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे तरी ओबीसी बांधवांनी देश व्यापी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page