Thursday, April 16, 2026
HomeFestivalsरामनवमीच्या भव्य शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे
spot_img

रामनवमीच्या भव्य शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे

रामनवमीच्या भव्य शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे

ज्योत्स्ना वानखेडे:

मागील 48 वर्षापासून रामनवमीनिमित्त चंद्रपुरात ऐतिहासिक काळाराम मंदिर समाधी  वार्ड चंद्रपूर येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी 26 एप्रिल गुरुवार  सायंकाळी पाच वाजता रामनवमीनिमित्त श्री काळाराम मंदिर देवस्थान व शोभायात्रा समिती तर्फे चंद्रपूर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात हिंदू समाजातील विविध जाती, पंथ, संप्रदाय तथा सामाजिक संस्था, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, भजन मंडळी, व्यापारी प्रतिष्ठान सहभागी होत असून विविध कलाकृती व झाकीया चे आयोजन करण्यात आले आहे.

 तसेच शोभायात्राच्या महामार्गावर विविध संस्थेतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

 *यावर्षी अग्र पूजेचा मान पालेवार समाजाला*

मागील अनेक वर्षापासून रामनवमीनिमित्त सामाजिक समरसतेचा प्रदर्शन शोभायात्रेत होत असून याही वर्षी ती परंपरा श्री काळाराम  मंदिर देवस्थान व शोभायात्रा समितीने कायम ठेवली आहे.

 यावर्षी शोभायात्राच्या पूर्वी आद्य पूजेचा मान चंद्रपूर जिल्ह्यातील पालेवार   समाजाला देण्यात आला आहे. पालेवार समाजाचे  अध्यक्ष श्री अभय बडकेलवार सचिव श्री राजेंद्र गरगेलवार , कोषाध्यक्ष अजय कोतपल्लीवार, नगरसेविका सौ किरण कोतपल्लीवार, प्रदीप गर्गीलवार, सचिन कोतपल्लीवार, रवींद्र धर्मेलवार, अरुण गर्गेल्वर, विजय जीजीलवार, श्याम पडगिलवार, दीपक पडगिलवार  हे सपत्नीक आपल्या समाजबांधवांसह  श्री काळाराम मंदिर येथे येऊन विधिवत प्रभू श्री रामाची पूजा करेल व त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल. तसेच शोभायात्रा पूर्वी सर्व समाजातील बांधवांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी सुदर्शन समाजातर्फे सुरू झालेल्या अग्र पूजेचा मान कार्यात वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, जैन समाज, गोंड समाज, मातंग समाज, मादगी समाज, सुतार समाज, धोबी समाज, बुरड समाज, तेलगू शिंपी समाज, धनगर समाज, कैकाडी समाज, गवळी समाज, खाटीक समाज, कुंभार समाज , भोई समाज, फुलमाळी समाज इत्यादी समाज बांधवांना मिळाला आहे.

 ही सामाजिक समरसतेची परंपरा अशीच पुढे कायम ठेवण्याचा व समाजात एकात्मता व एकोपा निर्माण करण्याचा श्री काळाराम मंदिर शोभायात्रा समितीचा उद्देश आहे.

श्रीराम नवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत हिंदू समाजातील सर्व जाती, पंथ, संप्रदाय व धार्मिक  संस्थानांनी आपापल्या कुलदैवत, संत तथा थोर पुरुषांच्या प्रतिमा झाकीसह व सर्व रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन श्री काळाराम मंदिर देवस्थानाचे विश्वस्त माननीय श्री  विजय दोमलवार, सौ वैभवी विजय दोमलवार, रमेशचंद्रजी बागला, वसंत थोटे, विवेक आंबेकर, गणपत सत्रे, शैलेश बागला, रोडमल गहलोत, अजय वैरागडे , विनोद उपाध्याय, घनश्यामजी दरबार, प्रा. श्याम धोपटे, सुमेध कोतपल्लीवार, मिलिंद गंपावर,  आशिष जोशी, एड. मनीष मुंदडा, एड. नितीन गाठकीने, संजयराव कुलकर्णी, दामोदर मंत्री, डॉक्टर महावीर सोईतकर, निलेश चोरे,अजय जयस्वाल, राजेंद्र गांधी, अर्णव दोमलवार, सौ मुग्धा खाडे, सौ क्षमा महाकाले, सौ भारती दुधानी, सौ रिता पांडे  तथा सर्व विश्वस्त श्री काळाराम मंदिर देवस्थान तर्फे करण्यात येत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page