Friday, June 19, 2026
HomeChandrapurशक्तीवीर धिराल यांची भाजप चित्रपट सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती ...
spot_img

शक्तीवीर धिराल यांची भाजप चित्रपट सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नावाची घोषणा..

शक्तीवीर धिराल यांची भाजप चित्रपट सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती, आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नावाची घोषणा..

Jyotsna Wankhede: भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट सेलच्या अध्यक्षपदी शक्तीवीर धिराल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज भारतीय जनता पक्षाच्या महानगर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात शक्तीवीर धिराल यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “चित्रपट, कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो. भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी चित्रपट सेलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शक्तीवीर धिराल यांना या क्षेत्राचा अनुभव असून त्यांच्या नेतृत्वात चित्रपट सेल अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास आहे.

ते पुढे म्हणाले की, “पक्ष संघटना सतत विस्तारत असून विविध क्षेत्रांतील गुणी व सक्रिय व्यक्तींना संधी दिली जात आहे. पक्षाच्या विचारधारेचा प्रसार, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद आणि नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम चित्रपट सेलच्या माध्यमातून केले जाईल. असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, सिनेट सदस्य, निलेश बेलखेडे यांच्यासह ईतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

  

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page