Wednesday, June 24, 2026
Homeबल्लारपूरआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनीला...
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनीला मान्यता

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनीला मान्यता

आदिवासी व ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी

आ. मुनगंटीवार यांनी मानले पालकमंत्री अशोक उईके यांचे आभार



*Jyotsna Wankhede*: ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यातील नैसर्गिक क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत यासाठी सातत्याने धडपड करणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर (विसापूर) येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, या निर्णयामुळे चंद्रपूर, गडचिरोलीसह आदिवासी व ग्रामीण भागातील गुणवंत युवक-युवतींसाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची नवी दालने खुली झाली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बल्लारपूर (विसापूर) येथील तालुका क्रीडा संकुलात तिरंदाजी खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ही प्रबोधिनी कार्यान्वित होणार असून, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासीबहुल व दुर्गम जिल्ह्यांमधील युवकांमध्ये तिरंदाजी खेळाबाबत नैसर्गिक गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. या गुणवत्तेला योग्य दिशा मिळावी आणि खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच प्रयत्नांना यश मिळत आता बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रबोधिनी उभारली जाणार आहे.

तिरंदाजीसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना प्रगतीची नवी संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू या प्रबोधिनीतून घडतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकजी उईके यांचे विशेष आभार मानले आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय साकार झाला असून, याचा लाभ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो होतकरू खेळाडूंना होणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page