Tuesday, July 7, 2026
HomeChandrapurचंद्रपूर महाऔषणिक विद्युत केंद्रातील जीर्ण झालेल्या इमारती व पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करावे...
spot_img

चंद्रपूर महाऔषणिक विद्युत केंद्रातील जीर्ण झालेल्या इमारती व पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करावे : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

चंद्रपूर महाऔषणिक विद्युत केंद्रातील जीर्ण झालेल्या इमारती व पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करावे : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

डीपीआर तयार करून नूतनीकरणाची कामे हाती घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

*Jyotsna Wankhede*: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील कन्व्हेयर बेल्टखाली लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर  विधानसभेत  तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महाऔषणिक विद्युत केंद्रातील जीर्ण झालेल्या इमारती, कन्व्हेयर बेल्ट प्रणाली आणि अन्य पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यासाठी डिपीआर तयार करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच डी पी आर तयार करून नूतनीकरणाची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अनेक इमारती, कन्व्हेयर बेल्ट प्रणाली तसेच विविध पायाभूत सुविधा या अनेक दशकांपूर्वी उभारण्यात आल्याने त्या कालबाह्य व जीर्ण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. अलीकडे घडलेल्या आगीच्या घटनेमुळे या सुविधांचे तांत्रिक परीक्षण व आधुनिकीकरण तातडीने करण्याची आवश्यकता अधिक अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संपूर्ण प्रकल्पातील इमारती, कन्व्हेयर बेल्ट प्रणाली आणि इतर पायाभूत सुविधांचे तांत्रिक सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात यावा, त्याआधारे टप्प्याटप्प्याने नूतनीकरणाची कामे हाती घ्यावीत तसेच अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षितता आणि देखभाल व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या सूचनांशी सहमती दर्शविली. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील जुन्या इमारती व पायाभूत सुविधांचे सविस्तर तांत्रिक परीक्षण करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल  तयार करण्यात येईल तसेच त्यानुसार आवश्यक नूतनीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याचे वेळेत आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यातील दुर्घटनांचा धोका कमी होईल, कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी मिळेल आणि राज्याची वीजनिर्मिती अधिक सुरक्षित, कार्यक्षम व विश्वासार्ह होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page