Thursday, July 9, 2026
HomeMaharashtraगोमातेच्या संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा बुलंद आवाज; विधानसभेत मांडलेल्या मागण्यांना शासनाचा...
spot_img

गोमातेच्या संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा बुलंद आवाज; विधानसभेत मांडलेल्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

गोमातेच्या संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा बुलंद आवाज; विधानसभेत मांडलेल्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

गोवंश संरक्षण कायदा अधिक कडक करण्याची ग्वाही ; राज्यमंत्री पंकज भोयर यांचे सभागृहात आश्वासन

उच्चस्तरीय बैठक, गोसेवा आयोगाला अधिक अधिकार, विशेष पथके व उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर कारवाईबाबत शासन सकारात्मक



*Jyotsna Wankhede* : गोमाता ही केवळ एक प्राणी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आपल्या जीवनमूल्यांचे प्रतीक आहे, अशी ठाम भूमिका मांडत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेत गोवंश संरक्षणाचा विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि प्रभावीपणे मांडला. गोवंश तस्करी, अवैध कत्तल, विद्यमान कायद्यातील त्रुटी, गोसेवा आयोगाच्या मर्यादित अधिकारांसह गोवंश संरक्षणाशी संबंधित विविध गंभीर प्रश्न त्यांनी ठोस उदाहरणांसह सभागृहासमोर मांडले. कायदा अधिक कठोर करण्यापासून ते गोवंश संरक्षणासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक विधायक सूचना त्यांनी सरकारसमोर ठेवल्या. आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची गंभीर दखल घेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या वतीने सकारात्मक भूमिका जाहीर करत पुढील तीन महिन्याच्या आत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन देत सकारात्मक प्रतिसाद दिला.

गोवंशाला २०२४ मध्ये “राज्यमाता”चा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असला, तरी प्रत्यक्षात गोतस्करी, अवैध कत्तल आणि गोमांस तस्करीच्या घटना अद्यापही घडत असल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “राज्यमाता”चा दर्जा हा केवळ सन्मानापुरता मर्यादित न राहता त्यामागील भावना प्रत्यक्षात उतरली पाहिजे. त्यासाठी विद्यमान कायदा अधिक कठोर करणे, सक्षम आणि उत्तरदायी यंत्रणा उभी करणे तसेच प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सभागृहात मांडले.

चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षेचा कालावधी वाढविणे, आर्थिक दंड कठोर करणे, राज्य गोसेवा आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देणे, गोवंश तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करणे, जिल्हा व राज्यस्तरीय समित्या स्थापन करणे, विशेष पोलिस पथके उभारणे, प्रत्येक जनावराचे यूआयडी टॅगिंग सक्तीचे करणे, सीमावर्ती तपासणी नाक्यांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसविणे आणि कुरण विकासाला गती देणे अशा अनेक विधायक सूचना सभागृहासमोर ठेवल्या.

या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. वारंवार गोवंश तस्करी करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई, वाहनांबाबत कडक धोरण, गोसेवा आयोगाच्या अधिकारवाढीचा प्रस्ताव, विशेष पोलिस पथके, यूआयडी टॅगिंग, सीमावर्ती तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही आणि गोवंश संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध विभागांच्या समन्वयासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याची केलेली मागणीही शासनाने मान्य केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तीन महिन्यांच्या आत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल तसेच सभागृहात मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांवर सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.

गोवंश संरक्षणाचा विषय केवळ कायद्याचा नाही, तर समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि संवेदनांशी जोडलेला असल्याची भूमिका आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विधायक सूचनांमुळे गोवंश संरक्षण अधिक सक्षम करण्याच्या दिशेने शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने राज्यातील गोसेवक, शेतकरी आणि गोभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page