Sunday, September 20, 2026
spot_img
HomePolice*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात दाखल १४ नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न*

*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात दाखल १४ नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न*

*चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात दाखल १४ नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न*

*पालकमंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते १४ नवीन वाहने आणि शहरातील सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दोन अत्याधुनिक ‘मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन’ सेवेत दाखल*

*’सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर’ या उद्दिष्टाला मिळणार नवी गती*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता, गती आणि गतिशीलता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीकडून (DPC) प्राप्त निधीतून दाखल झालेल्या १४ नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा  दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर सोहळा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान. ना. डॉ. श्री. अशोक उईके यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी खासदार श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर (चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ), विधान परिषद सदस्य मान. आ. श्री. सुधाकर अडबाले यांच्यासह स्थानिक आमदार मान. आ. श्री. किशोर जोरगेवार (चंद्रपूर), मान. आ. श्री. देवराव भोंगळे (राजुरा) व मान. आ. श्री. करण देवतळे (वरोरा) उपस्थित होते. याशिवाय प्रशासकीय अधिकारी म्हणून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी मा. श्रीमती वसुमना पंत (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) मा. श्री. पुलकित सिंह (भा.प्र.से.) आणि चंद्रपूर मनपा आयुक्त मा. श्री. अकुनुरी नरेश (भा.प्र.से.) यांचे समवेत पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री अजिंक्य तांबडे, पोनी स्थागुशा चंद्रपूर श्री अमोल काचोरे, पोनी चंद्रपूर शहर श्री निशीकांत रामटेके, पोनी रामनगर श्रीमती प्रभावती एकुरके, पोनी वाहतुक श्री अमोल बारापात्रे, पोनी श्री सचिन पवार, पोलीस मोटार परिवहन विभाग, रापोनी पोमु श्री किसन नवघरे, रापोउपनि श्री रासेकर, पोउपनि श्री प्रविण खरतड बिनतारी संदेश विभाग चंद्रपूर व मोठ्या संख्याने पोलीस अंमलदार आणि जिल्हा माहिती अधिकारी श्री राजेश येसनकर यांचे समवेत जिल्ह्यातील प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजीटल मिडीया चे संपादक, पत्रकार व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त झालेल्या या आधुनिक वाहनांसोबतच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दीच्या ठिकाणी प्रभावी निगराणी ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ‘मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन’चे सुद्धा लोकार्पण करण्यात आले.

ही विशेष व्हॅन शहरातील संवेदनशील भाग, मोर्चे, सण-उत्सव आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून थेट परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.

*सीसीटीव्ही व्हॅनची ठळक वैशिष्ट्ये:*

– *३६० अंश फिरणारे हाय-डेफिनिशन कॅमेरे:* वाहनावर उच्च क्षमतेचे पीटीझेड (PTZ) आणि नाईट-व्हिजन कॅमेरे बसवण्यात आले असून, ते लांबच्या परिसराचे स्पष्ट चित्रण करण्यास सक्षम आहेत.

– *थेट नियंत्रण कक्षाशी जोडणी (Live Monitoring):* व्हॅनमध्ये बसवलेले कॅमेरे थेट मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी (Command & Control Centre) जोडण्यात येत असून अधिकारी जागेवरूनच हालचालींवर बारीक नजर ठेवू शकतील.

– *मोबाईल कंट्रोल रूम:* वाहनाच्या आत आधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोरेज आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली (Public Address System) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

– *त्वरित प्रतिसाद आणि सुरक्षा:* कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा गर्दी अनियंत्रित झाल्यास तातडीने निर्णय घेण्यासाठी ही व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरेल.

नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असून या फिरत्या सीसीटीव्ही व्हॅनमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल आणि शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेला मोठे बळ मिळेल. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त झालेल्या या आधुनिक वाहनांमुळे जिल्ह्यातील गस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने सामोरे जाणे अधिक सुलभ होईल.

सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे (म.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलीस दलाच्या पोलीस मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील पोलीस सर्व अधिकारी व अंमलदारांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page