*दिल्ली येथील ठिय्या आंदोलनासाठी ८ ऑक्टोबरला कॉन्स्टिट्यूशन क्लब ,नवी दिल्ली येथे ओबीसींची महत्वाची बैठक*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
भारत सरकारने राजपत्राच्या प्रश्नावली मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र्य कॉलम ची सूची नसल्याने,२०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या नियोजन व ओबीसींच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बेंगलूरु (कर्नाटक), नागपूर (महाराष्ट्र), हैदराबाद (तेलंगणा) छिंदवाडा (मध्यप्रदेश) बैठका नंतर दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ ला कॉन्स्टिट्यूशन क्लब ,रफी मार्ग नवी दिल्ली येथे दुपारी १२ पासून बैठकीचे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीत २०२७ जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावी या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या ठिय्या आंदोलनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. सदरची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे , बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड, राज्य मागासवर्गीय आयोगाने माजी सदस्य तथा ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष इक्बाल अन्सारी आणि खासदार , आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि ओबीसी संघटनाचे अध्यक्ष, सर्व जात संघटनाचे पदाधिकारी महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहणार आहेत असे राष्ट्रीय ओबीस महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी कळविले आहे.