*गौरक्षण वार्डातील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषद बल्लारपूर कडे परिसरातील 37 नागरिकांनी तक्रार अर्ज दिला असून कोणतीही कार्यवाही न झाल्या बाबत*
ज्योत्स्ना वानखेडे*:
गौरक्षण वार्डातील स्थानिक 37 नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषद बल्लारपूर कडे तक्रार अर्ज दिला होता. परंतु आज घडीला अतिक्रमण हटले नाही. उलट वाहतूक व वळण घेण्यासाठी जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्यावरील अवैध अतिक्रमण 1) श्री. टिकले, 2) श्री. नंदूरकर व 3) श्री. गोरघाटे यांनी रस्त्यावर अतिक्रमण साडे दहा फूट पर्यंत केले असून रहदारीस फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पूर्ण रस्ता 30 फूट रुंद आहे. व तो ले आऊट नकाशा नुसार आहे. या बाबत प्रत्यक्ष मौका चौकशी करून, अतिक्रमणला प्रोत्साहन न देता स्थानिक जनतेची अडचण लक्षात घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश द्यावे. अशा प्रकारचे निवेदन मा. मुख्याधिकारी, न.प. बल्लारपूर यांना नरेंद्र मेश्राम,*सचिव, आदर्श बुद्ध विहार मंडळ, बल्लारपूर* रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर यांनी दिनांक : १७/०९/२०२६ रोजी दिले आहे.