Monday, October 12, 2026
spot_img
HomeChandrapur*चांदा इको फाउंडेशन तर्फे गणेश मंडळांना बक्षिस वितरण*

*चांदा इको फाउंडेशन तर्फे गणेश मंडळांना बक्षिस वितरण*

*चांदा इको फाउंडेशन तर्फे गणेश मंडळांना बक्षिस वितरण*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चांदा ईको केअर फाउंडेशन चंद्रपूर तर्फे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी पर्यावरण पूरक देखावा व नशा मुक्ती अभियान या विषयाचा प्रचार प्रसार करण्याकरिता चंद्रपूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाना  आवाहन करण्यात आले होते.
यात *प्रथम क्रमांक* श्री *नवयुवक गणेश मंडळ दत्तनगर* यांना आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्यातर्फे तीन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, *द्वितीय क्रमांक*  *पठाणपुरा व्यायाम शाळा चंद्रपूर* यांना स्व. बाबूरावजी गो. बनकर स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांच्या स्मृतिपित्यर्थ दिवाकर बनकर यांच्यातर्फे दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह,  *तृतीय पारितोषिक विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा गणेश मंडळ* यांना माजी नगरसेवक  प्रसन्ना शिरवार यांच्यातर्फे एक हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह तसेच *प्रोत्साहनपर पारितोषिक  जे बी नगरचा चिंतामणी सार्वजनिक गणेश मंडळ* यांना स्मृतिचिन्ह, चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार ,चांदा इको केअर फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक आंबेकर ,सचिव पद्माकर मोरे , उपाध्यक्ष अशोक दुर्गे, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर योग नृत्य परिवार तर्फे अशोक घोडमारे तथा आझाद बगीच्यातील ज्येष्ठ नागरिक व सर्व योग मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी केले.  आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी नशा मुक्ती अभियान याचा प्रचार प्रसार करून तरुण मुलांना नशेपासून वाचविणे व निरोगी युवा पिढी निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज असून चांदा ईको केअर फाउंडेशन तर्फे पर्यावरण रक्षण व नशा मुक्ती अभियान यासारखे कार्यक्रम राबवून समाजात जनजागरण करण्याचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे म्हटले व संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाचे संचालन अशोक दुर्गे व अतुल अल्याडवार यांनी तर आभार प्रदर्शन पद्माकर मोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर इको केअर फाउंडेशन चे सदस्य अतुल देवतळे, आनंद निरंजने, संजय रागणकर, प्रदीप देवईकर, अरविंद बनकर, सतीश पेठे, अविनाश रेशीमवाले प्रशांत निंबाळकर, राजू कामडे तथा योग नृत्य परिवार चंद्रपूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page