अंडरपास रस्त्याचे कामात निष्काळजीपणाचा कळस : काँक्रीट वर आठ दिवसापासून पाणीच टाकले नाही
Shreyash Wankhede:
तालुक्यातील १७ हजार लोकसंख्या असलेल्या विसापूर गावातील अंडरपास बोगद्यातून जाणारा एमडीआर ४१ क्रमांकाचा विसापूर-बल्लारपूर रोड मध्य रेल्वेच्या बल्लारशाह- वर्धा प्रस्तावित चौथ्याला रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणामुळे २ मे २०२४ पासून बंद करण्यात आला होता. तो सुरू करण्यात आला; पण त्या मधून नवीन पर्यायी रोड काढण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरूच आहे व त्यावर कळस म्हणजे रस्त्याच्या कडेला बांधण्यात येणाऱ्या सुरक्षा भिंतीच्या पायाव्यात आठ दिवसापूर्वी काँक्रीट टाकण्यात आले होते. तेव्हापासून तेथे पाणी दिले नसल्यामुळे कामाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व यामुळे कामात निष्काळजीपणा कळस गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात किती मोठा अपघात होईल याची शक्यता नाकारता येत नाही. करीता कंत्रातदारावर रेल्वे प्रशासनने कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता राजू लांडगे यांनी केली आहे.
बोगद्याच्या बाजूने अंडरपास रोडचे नवीन रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. व कंत्राटदार आपल्या मर्जीने नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत काम करत आहे व त्यावर कळस म्हणजे तेथे रोडला लागून सुरक्षभिंतिच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यासाठी वाठ दिवसा अगोदर काँक्रीट टाकण्यात आले. व दिवाळीमुळे परराज्यातील मजूर गावी गेल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले. परंतु स्थानिक मजूर लावून त्याचा मजबुतीसाठी पाणी देण्याचे अपेक्षित होते. परंतु त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केला जात आहे यावरून कामात किती हयगय व निष्काळजीपणा कंत्राटदार करीत आहे हे दिसून येत आहे व हे राजू लांडगे व अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितले आहे. असा त्यांनी दावा केला आहे. त्यामुळे भविष्यात ही सुरक्षाभिंत पडून जीवितहानी झाल्यास याला कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न नागरिक करीत आहे. करीता रेल्वे प्रशासनाने कंत्राटदारावार त्याच्या या निष्काळजीपणाबद्दल कठोर कारवाई करून ते काँक्रीट काढून नवीन टाकण्यात यावे व योग्य वॉटर क्युरिंग करण्यात यावी अशी मागणी होत आहे.