Thursday, January 22, 2026
Homeबल्लारपूरस्वयंपाकी - मदतनीस यांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांची आप सोबत बैठक
spot_img

स्वयंपाकी – मदतनीस यांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांची आप सोबत बैठक

स्वयंपाकी – मदतनीस यांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांची आप सोबत बैठक

सौ. ज्योत्सना वानखेडे:
संपूर्ण जिल्ह्य़ात फक्त बल्लारपूर मध्येच असलेली केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली, स्वयंपाकी व मदतनीस महिलांचे मानधन यांच्य प्रश्नावर आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी साहेबांना तात्काळ बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शुक्रवार दिनांक: 22/12/ 2023 रोजी मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, केंद्रीय स्वयंपाकगृह कंत्राटदार व मदतनीस महिलांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी मदतनीस महिलांना शासननियमानुसार दरमाह 2500 रूपये मानधन देण्याची मागणी केली. तसेच हे शक्य नसेल तर केंद्रीय स्वयंपाकगृह पध्दत बंद केली जावी असे म्हटले. या बैठकीत मानधनाबाबत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे, जो पर्यंत मदतनीस महिलांना न्याय मिळत नाही. तोवर शांत बसणार नाही असा इशारा देखील पक्षातर्फे देण्यात आला. या बैठकीत मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा  संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, आप चे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, सचिव ज्योतीताई बाबरे, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, उपाध्यक्ष अफजल अली, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सहसचिव आशिष गेड़ाम तसेच सर्व मदतनीस महिला उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page