Monday, June 22, 2026
HomeChandrapur*म्हातारदेवी साझ्या तलाठी विवेक खांडरे यांच्या विरोधात गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा*
spot_img

*म्हातारदेवी साझ्या तलाठी विवेक खांडरे यांच्या विरोधात गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा*

*म्हातारदेवी साझ्या तलाठी विवेक खांडरे यांच्या विरोधात गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा* 

*ज्योत्स्ना वानखेडे*: चंद्रपूर – म्हातारदेवी साझ्या तलाठी विवेक खांडरे यांच्या  पैसे घेतले शिवाय काम न करणे  तसेच उद्धट वागणूकिला जनता कंटाळली असून  महसूल सचिव तरी कारवाई करते की काय? याकडे शेतकरी वर्ग याचे लक्ष लागले आहे.

महसूल विभाग हा नियमबाह्य वसुली करणारे विभाग झाला आहे की काय असा प्रश्न पडतो आहे. तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी स्थानिक आमदार यांचे तक्रार करून आजपर्यंत काही उपयोग झाला नाही. दोन वर्षा पासून नवीन तलाठी खांडरे यांना रेती तस्कर यांची साथ असल्याने ते मुजोर बनून खुलेआम  फेरफार, निराधार महिला उत्तपनाचा दाखला यासाठी पैश्याची मागणी करतो.  तसेच लोकांना म्हणतो की जा तुम्हाला जित जायचं आहे तिथे जा  फोन माध्यमातून तक्रार केली काही  कारवाई झाली नाही.
त्यानंतर दिनांक १४/१०/२०२५ ला अनेक शेतकरी यांच्या स्वाक्षरीने त्याची तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली.तरी पण आजपर्यंत कोणत्याही वरीष्ठ अधिकारी यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला नाही.तक्रार करा म्हणून सांगतात परंतु कारवाई होत नाही. तेव्हा या तलाठी याला लोकांवर अन्याय करण्यासाठी ठेवले आहे का, तेंव्हा  याला कोणत्या वरीष्ठ अधिकारी व राजकीय पुढारी याचा आशिर्वाद असेल तर त्यांनी आपला सहाय्यक म्हणून ठेवावे. तसेच आता शेतकरी सामान्य माणूस यांचा अंत पाहू नये.येत्या आठ दिवसात  तलाठी यांचेवर कारवाई करा  असे निवेदन महसूलमंत्री, महसूल सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन माध्यमातून गावकरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page