*बल्लारपुरात अयोध्या धाम अक्षता कलश यात्रा*

श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर येथे वस्ती विभागात गोविंद बाबा मंदिर येथून अयोध्या धाम अक्षता कलश यात्रा काढण्यात आली. वस्ती विभागात निघालेल्या या यात्रेचे समापन श्रीराम मंदिर गांधी चौक बल्लारपूर येथे करण्यात आले.
अयोध्या धाम येथून आलेल्या कलश मधील अक्षता चे वितरण येणाऱ्या दिवसात घरोघरी करण्यात येणार असून, अक्षतेसोबत आयोध्या येथे बनणार असलेल्या श्रीराम मंदिराचा फोटो व आवाहन पत्र सुद्धा देण्यात येणार आहे.
दिनांक: 22/01/ 2024 रोजी मान. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आयोध्या धाम येथे गर्भगृहात श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या आरतीच्या वेळेस, ह्या अक्षता आपापल्या परिसरातील मंदिरात सकाळी: 11 ते 12.30( आरती झाल्यानंतर) वाजेपर्यंत देवाच्या मूर्तीला वाहण्यात येणार आहे.
या अक्षता कलश यात्रेत परिसरातील असंख्य स्त्री-पुरुष समाविष्ट झाले होते. शेवटी श्रीराम मंदिर परिसरात फ्रुटीचे वितरण करण्यात आले.