Thursday, August 27, 2026
spot_img
HomeChimur*"अवैध दारु विक्री करणारे दोन आरोपी तडीपार"*

*”अवैध दारु विक्री करणारे दोन आरोपी तडीपार”*

*”अवैध दारु विक्री करणारे दोन आरोपी तडीपार”*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील दोन कुख्यात दारु विक्रेते नाव संजय तुकाराम भोयर, वय 48 वर्ष व संजय विनायक भैसारे वय 45 वर्षे दोन्ही राहणार चिमूर यांच्यावर पोलीस स्टेशन चिमूर येथे अवैध दारु विक्री तसेच मारहाणीचे गुन्हे दाखल होते. ते सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडण्याचे कामे करीत असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातुन हद्दपार करणे अत्यंत गरजेचे होते. त्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस स्टेशन चिमूर येथून मा. उपविभागीय दंडाधिकारी चिमूर यांना हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आले होते. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन दोन्ही इसम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व वारंवार गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने श्री किशोर घाडगे, उपविभागीय दंडाधिकारी चिमूर यांनी दोन्ही गुन्हेगारांना दोन महिने चंद्रपूर जिल्ह्यातुन हद्दपार करण्याचे आदेश निर्गमीत केले आहे. सदर कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले असुन नागरीकांनी पोलीसांचे कौतुक केले आहे.
सदर आदेश मा. पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व डीबी पथक पोलीस स्टेशन चिमूर यांचे प्रयत्नातुन पारीत झाले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page