Wednesday, April 15, 2026
HomeSpardhaकेंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा संपन्न
spot_img

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा संपन्न

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा संपन्न

श्रेयश वानखेडे:

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा केंद्र – बामणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमितनगर बामणी येथे दिनांक: 11/01/2024 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा पपीता उदीसे मॅडम ,  अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अमितनगर, कार्यक्रमाचे उद्घाटक – *मा. प्रल्हाद आलाम सर सरपंच ग्रामपंचायत बामणी, प्रमुख पाहुणे — मा. शरद बोरीकर सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, मा. रवींद्र लामगे सर, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, मा.सुभाष ताजने सर, उपसरपंच ग्रामपंचायत बामणी, मा. संतोष मडावी सर, सदस्य ग्रामपंचायत बामणी,मा. कविता खामनकर मॅडम, सदस्य ग्रामपंचायत बामणी,मा.सबतकोर भोंड मॅडम, केंद्रप्रमुख -बामणी,मा. टेंभुणें सर मुख्याध्यापक जि. प .उच्च प्राथमिक शाळा बामणी दुधोली, मा. चंदा धारणे मॅडम मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेली जुनी, मा.उराडे सर, मुख्याध्यापक जि .प .प्राथमीक शाळा अमितनगर  मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमितनगर शाळेच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे स्वागत नृत्य सादर केले.नंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सबतकौर भोंड मॅडम, केंद्रप्रमुख बामणी यांनी केले व स्पर्धेची रूपरेषा सविस्तर मा.शरद बोरीकर सर,गटशिक्षणाधिकारी  पंचायत समिती बल्लारपूर यांनी दिली आणि रवींद्र लामगे सर, शिक्षणविस्तार अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. संदीप पवार सर आणि  आभार  मा.उराडे सर , मुख्याध्यापक जि. प. प्राथ. शाळा अमितनगर यांनी केले. सदर स्पर्धा करिता मा. संजय नासिरकर सर, श्री. बालाजी हायस्कूल बामणी, मा. किशोर मोहूर्ले सर*, मोन्टफोर्ट हायस्कूल बामणी तसेच रंजू दुपारे* , साधनव्यक्ती पं. स. बल्लारपूर वैशाली धार्मिक, विशेष शिक्षक बामणी यांची उपस्थिती होती.

    तसेच  बुद्धिमापन, सुंदर हस्ताक्षर स्वयंस्फुर्त  लेखन,  स्मरणशक्ती व चित्रकला या स्पर्धेकरिता बामणी केंद्रातील मा. प्रीती जगजाप मॅडम,  मा.श्री चांदेकर सर , मा.पांडुरंग बोबडे सर ,मा. सुनील पोटे सर, मा. सुनील कुमरे सर , मा, शालिनी कोवे मॅडम,मा.अरुणा झाडे मॅडम ,मा. श्री दाखणे सर,मा. कविता गेडाम मॅडम ,मा.अमित साखरकर सर, मा. वंदना मार्कंडवार मॅडम, मा. शेखर वानखेडे सर,मा. वनिता भसारकर मॅडम ,मा.संदीप पवार सर , सर्वांनी परिक्षक म्हणून  उत्तम काम व सहकार्य केले.

मा.पोडे सर, व  मा.गजानन चिंचोलकर सर यांनी  सर्व  निकाल संकलन चे उत्कृष्ट काम केले याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानण्यात आले. प्राथ. व उच्च  प्राथमिक गटातून एकूण 9 स्पर्धा यामध्ये  कथाकथन, स्वयंस्फुर्त भाषण, वादविवाद , एकपात्री भूमिका ,बुद्धिमापन ,सुंदर हस्ताक्षर, स्वयंस्फूर्त लेखन, स्मरणशक्ती व चित्रकला या स्पर्धा घेण्यात आल्या.

विजय स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले  व उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. मा.सुनील पोटे सर , मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा कळमना यांनी नवरत्न स्पर्धेबाबत  आपले मनोगत व्यक्त केले. तसेच  देविका चौधरी जि .प.उच्च प्राथ.  शाळा जुनी दहेली  च्या विद्यार्थिनींनी आपले स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले.जि .प .प्राथ शाळा अमितनगर शाळेने उत्तम असे नियोजन ,आयोजन व सहकार्य केले.

नवरत्न स्पर्धेकरिता बामणी केंद्रातील सर्व जि. प. शाळेचे मा.मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक , तसेच गटसाधन केंद्रातील सुनीता  पिपरे IE साधनव्यक्ती, लीना  रहांगडाले  साधनव्यक्ती उपस्थित होते .

स्पर्धेचे व बक्षीस वितरणाचे संचालन माया वाठोरे साधनव्यक्ती आणि  आभार मा.भोंड मॅडम  केंद्रप्रमुख बामणी यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page