श्रेयश वानखेडे:
तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपूर अंतर्गत वयोगट 14,17,19 वरील मुले/मुली यांची 100 मी 200मी.400मी. दौड तसेच आष्टे – डू – आखाडा स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभागी घेतला. व अनेकांनी पुरस्कार प्राप्त केला. सहभागी सर्वच खेळाडूंना नाश्ता, एनर्जी ड्रिंक, पाणी बॉटल, या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. या प्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड,अतिथी तालुका क्रीडा संयोजक श्री किशोर मोहुर्ले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन-नियोजन क्रीडा अधिकारी श्री मनोज पंधराम यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार उपस्थीत मान्यवर तसेच श्री गुलाम अहमद,श्री प्रमोद रामिल्लावार, श्री प्रशांत पिंपळे, श्री सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन स्वप्निल डंभारे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री परवेज खान,रितेश निरांजने आशिष पोलंमपल्ली, रोहित शर्मा, विवेक शर्मा, स्वप्निल ढोडरे,मनोज डे, मोनिका पोडे, कोमल जंजरला,बरखा यादव,वैष्णवी पिंपळे, तुषार आत्राम, जानवी कुडमिथे, वीरांगणा दुबे,दीक्षा केथवास यांचे सहकार्य लाभले