Sunday, August 9, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*पिडीत बालकांचे खाजगी माहिती उघड करणारा आरोपी अमन अंदेवार याच्यावर पोलीस ठाणे...

*पिडीत बालकांचे खाजगी माहिती उघड करणारा आरोपी अमन अंदेवार याच्यावर पोलीस ठाणे बल्लारपुर यांनी केला गुन्हा दाखल*

*पिडीत बालकांचे खाजगी माहिती उघड करणारा आरोपी अमन अंदेवार याच्यावर पोलीस ठाणे बल्लारपुर यांनी केला गुन्हा दाखल*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
पोलीस ठाणे, बल्लारपुर *अ.प.क्र. 815/2026* कलम *351(2) बी.एन.एस.* सहकलम *4, 6, 12 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधि. 2012* असा अत्याचाराचा गुन्हा दाखल असून दि. *06/08/2026* रोजी रात्री अंदाजे *21:30* वा. गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मो.क्र. *9527027322* यावरून व्हॉट्स अ‍ॅपवर एक प्रेस नोट पत्रकारांना व इतर व्यक्तींना प्रसारित करण्यात आलेली आहे.
त्या प्रेस नोटमध्ये पोलीस ठाणे बल्लारपुर येथे नुकत्याच दाखल असलेल्या गुन्ह्यातील *पिडीत अल्पवयीन बालकांची नावे* टाकून त्यांची ओळख उघड करण्यात आली आहे.
*तपासात काय समजले?*
सदर प्रेस नोट मो.क्र. *9527027322* वरून प्रसारित झाली असल्याने मोबाईलचा एस.डी.आर. काढले असता आम्हाला त्या मोबाईल धारकाचे नाव *अमन आनंद अंदेवार, रा. आंबेडकर वार्ड, बल्लारपुर* असे समजले.
आरोपी *अमन आनंद अंदेवार* हा पोस्टे बल्लारपुर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधि. 2012 अन्वये पिडीत बालकाचे नाव व ओळख ही कुठल्याही प्रसार माध्यमानी किंवा साधनाने उघड करणे प्रतिबंधित असताना, सुद्धा जाणीवपूर्वक आरोपीने पिडीत बालकाचे नाव व ओळख प्रेस नोट व्हॉट्स अ‍ॅपद्वारे सोशल मिडीयावर तसेच पत्रकार ग्रुपवर पाठवून पिडीत बालकांची प्रतिष्ठा व सुरक्षितता धोक्यात आणली.
*कोणता गुन्हा दाखल?*
त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे बल्लारपुर येथे *अ.प.क्र. 825/2026* कलम *23(4) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधि. 2012* सहकलम *74 बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) अधि. 2015* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*कार्यवाही*
सदरची कार्यवाही *मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी*, *मा. अपर पो. अधीक्षक ईश्वर कातकडे*, *श्री. सुधीर नंदनवार उपविभागीय पो अधिकारी, राजुरा* यांच्या मार्गदर्शनात *पो. निरिक्षक बिपीन इंगळे*, पोउपनि. उमेश जोगदंड, पोहवा. संतोष पंडीत, पो.अंमलदार महेश कुकूडकर, मिलींद आत्राम, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे, लखन चव्हाण इत्यादी पो. स्टाफ यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page