बामणी येथील शेरकी लेआऊट येथे तथागत भगवान बुद्ध सामाजीक संस्था बामणी(दू.) च्या वतीने भीमा कोरेगाव शौर्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ललित गेडाम, प्रमुख अतिथी डॉ. किशोर चौरे इत्यादींची विचारमंचावर उपस्थिती होती, कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून झाली.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी शौर्यदिनी भीमा कोरेगावच्या हुतात्म्यांना मानवंदना दिली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. किशोर चौरे यावेळी मार्गदर्शन करतांना पुढील विचार व्यक्त केले, भीमाकोरेगाव ची लढाई मानवी मूलभूत अधिकार आणि अस्मितेची लढाई होती, ही लढाई आत्मसम्मानासाठी होती, पेशवाईच्या काळात अस्पृश्य समाजाची अवस्था अतिशय बिकट होती, महार लोकांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती, म्हणून पेशवाई च्या विरोधात पाचशे महार सैनिकांनी १ जानेवारी १९१८ ला ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि पेशवाईचा अंत केला असे सांगितले. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ललित गेडाम यांनीही मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. सुनीता वाघमारे यांनी केले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व बौद्ध उपासक, उपाशीका मोठया प्रमाणात उपस्थित होते.