Wednesday, January 14, 2026
Homeबल्लारपूरइतिहास व राज्यशास्त्र विभागाद्वारे ' राष्ट्रीय मतदार दिन ' साजरा
spot_img

इतिहास व राज्यशास्त्र विभागाद्वारे ‘ राष्ट्रीय मतदार दिन ‘ साजरा

इतिहास व राज्यशास्त्र विभागाद्वारे ‘ राष्ट्रीय मतदार दिन ‘ साजरा

श्रेयश वानखेडे:

 

 बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मतदार दिनाचा ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ.  रजत मंडल, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. दिपक भगत,  प्रा. मोहनीश माकोडे, ई ची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली.

यावेळी डॉ. किशोर चौरे (इतिहास विभागप्रमुख) मार्गदर्शन करतांना म्हणालेत की ” मतदानाचा अधिकार देतांना पूर्वी नियमित कर भरणारे व सुशिक्षित मतदारांनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे असे काहीचे मत होते मात्र भारताची घटना तयार करतांना घटनाकारांनी भारतीय घटनेत वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना प्रौढ मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तसेच प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले मूलभूत व नैतिक कर्तव्य समजून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदान करतांना योग्य उमेदवारांची निवड करावी ज्यामुळे आपल्या देशाची लोकशाही मजबूत होण्याकरिता बळ प्राप्त होईल व लोकशाही टिकून राहील.

याप्रसंगी  त्यांनी प्रत्येक  भारतीय नागरीकांनी लोकशाहीवर निष्ठा कायम ठेवण्याची व निःपक्षपाती  व निर्भयतेने मतदानाचा हक्क पार पाडण्याची शपथ दिली. यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोहनीश माकोडे, तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. दिपक भगत यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. शुभांगी भेंडे,प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page